मुलाचा खुन केल्याप्रकरणी पित्यास जन्मठेप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०६: कौटुंबीक कारणांवरुन पित्याने स्वतः विषारी औषध पिउन आपल्या ८ वर्षीय मुलास विषारी औषध पाजुन खुन केला होता. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याचे सुनावणी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधिश मा.श्री आर.डी.सावंत सातारा यांचे कोर्टात होवुन आरोपी पित्यास भा.द.वि.स कलम ३०२ प्रमाणे जन्मठेप व रु २००० / – दंड दंड न दिलेस २ महीने साधी कैद , भा.द.स ३० ९ अन्वये १ वर्ष सक्त मजुरी व रु .१०० / – दंड दंड न दिलेस २ महीने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, संतोष लक्ष्मण भिंगारे वय ३५ वर्ष रा. पाचवड, ता. वाई हा पत्नी सौ. वैशाली व दोन मुले कुमारी राजश्री वय १० व मुलगा शिवराज वय ८ वर्ष यांचेसह उदरनिर्वाहासाठी पाचवड येथून आपले सासुरवाडी शिवनी, ता.कडेगाव जि.सांगली येथे एक वर्षाचे पासुन एकत्रात राहुन मोलमजुरी करत होते. तेथेच आपले दान्ही मुलांना शाळेत घातलेले होते. पती-पत्नीमध्ये घरगुती व कौटुबीक कारणावरुन किरकोळ भांडणे होत होती. आरोपी संतोष भिंगारे याचे वडील मयत झाल्याने तो शिवनी येथुन गावी पाचवड येथे एकटाच आलेला होता. दि.०३ / ३ / २०१७ आरोपी संतोष भिंगारे हा पाचवड येथुन शिवनी ता.कडेगाव येथे आपले पत्नीकडे न जाता मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत परस्पर शाळेत जावून मुलगा शिवराज यास शाळेतुन जबरदस्तीने घरी घेवुन जावु लागला. त्यावेळी मुख्याध्यापक व शिक्षक यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना न जुमानता मुलगा शिवराज यास पाचवड, ता.वाई येथे आला. दरम्यान घडलेला प्रकार शिक्षकांनी मुलाचे आईस कळविला. म्हणुन मुलाची आई वैशाली चिंचणी वांगी ता.कडेगाव येथिल पोलीस ठाणेस खबर देणेस गेल्या. तेथे मुलगा शिवराज यास माझ्या पतिने जबरदस्तीने शाळेतुन घेवुन गेले आहेत. याबाबत पोलीस ठाणेत तक्रार त्या नोंदवत नोंदवत असतानाच मुलगा शिवराज याचा फिर्यादी वैशाली हीचे फोनवर फोन आला व मुलगा शिवराज याने सांगितले की वडीलांनी मला विष पाजले सुन त्यांनी स्वतः ही विष प्राशन केलेले आहे. त्याच वेळी वैशाली यांनी पोलीस ठाणेत सदर खबर लिहुन घेणारे पो.ना.साठे यांचेकडे फोन दिला असता शिवराज याने पोलीसांन देखील तिच हकीकत सांगितली. त्यावेळी तुम्ही कोठे आहात असे विचारले असता त्याने आम्ही वाई येथे कृष्णा नदीचे पुलाजवळ आहोत.असे सागितले. आरोपी संतोष भिंगारे व त्यांचा मुलगा शिवराज यांना दि .०४ / ०३ / २०१७ रोजी सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे उपचारास दाखल केले. त्यावेळी शिवराज याची प्रकृती बिघडल्याने सातारा हॉस्पीटल रीसर्च सेंटर सातारा येथे उपचार घेत असताना १०/०३/२०१७ रोजी त्याचा मृत्यु झाला. सदर घटनेबाबत मुलाची आई वैशाली संताप भिंगारे यांनी दिले खबरी वरुन फिर्याद दाखल केली आहे.

या गुन्हयाचा तपास करुन आरोपीचे विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सदर गुन्हयाचा तपास पो.उप.निरीक्षक गणेश कदम व पो.उप निरीक्षक साळी यांनी तत्कालीन भुईंज पोलीस स्टेशन यांनी करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावे तसेच शास्त्रोक्त पुरावा प्राप्त करुन मुदतीत मा.न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केले होते. नमुद खटल्याची सुनावणी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश आर.डी.सावंत यांचे न्यायालयामध्ये झाली. याप्रकरणी न्या. सावंत यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

नमुद खटल्याची सुनावणीमध्ये सरकारी वकील नितिन दिनकरराव मुके यांनी काम पाहीले असुन पैरवी अधिकारी म्हणुन पो.कॉ.रोहीत यादव ब.नं .२६० ९ भुईज पोलीस स्टेशन . तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड साताराचे श्री.राजेंद्र यादव ( पोलीस उप – निरीक्षक ) , शिवाजी घोरपडे ( पोलीस उपनिरीक्षक ) व पोलीस अंमलदार स . पो.उप. नि . श्रीमती घारगे , पो.हवा .१०५० शेख , म . पो.हवा .२०७८ बेंद्रे , पो.हवा .६ ९ २ शिंदे , म . पो.ना .१६४४ शेख , पो.कॉ .२३ ९ ६ कुंभार , म . पो.कॉ .१७ ९ ८ घोरपडे , पो . कॉ .३८६ भरते यांनी केस मध्ये सरकारी वकील यांना योग्य ते सहकार्य केलेले असून साक्षीदार यांना योग्य ते मार्गदशन केलेले आहे . श्री अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा , श्री.धिरज पाटील अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री राजेंद्र साळुके पो.उप.अधीक्षक गृह सातारा . यांनी तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक एस सी चामे व पैरवी अधिकारी सहा.पो.फौजदार श्री राजेभोसले मेढा पोलीस स्टेशन आणि प्रॉसिक्युशन स्क्वॉड , सातारा चे अंमलदार यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!