सासवडच्या मुलाने उपचारादरम्यान पाय गमावला; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप

वडिलांनी सातार्‍यात दिला सामूहिक आत्मदहनाचा इशारा


दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२५ | सातारा |
सासवड, ता. फलटण येथील शंभूराज संतोष राऊत या ११ वर्षीय मुलावर डॉ. युवराज कोकरे यांनी पायाचे चुकीचे ऑपरेशन केल्याने त्याला अपंगत्व आले आहे, असा आरोप त्याचे वडील संतोष राऊत यांनी सातार्‍यात पत्रकार परिषदेत करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात कारवाई न झाल्यास प्रजासत्ताक दिनी जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सातार्‍यात या संपूर्ण प्रकरणाची माहिती संतोष राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. संतोष राऊत यांनी त्यांचा मुलगा शंभूराज याचा पसरणी घाटात अपघात झाला होता. त्या अपघातात पायाला दुखापत झाल्याने त्याला फलटण येथील डॉ. युवराज कोकरे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. डॉ. कोकरे यांनी पायाचे ऑपरेशन केले आणि पायाला फिक्सर लावून प्लास्टर केले. आठवड्यानंतरही त्याच्या पायाची सूज उतरली नव्हती. त्याला अधिक उपचारासाठी पुण्यात हलवले असता, तेथे डॉक्टरांनी त्याचा पाय कापावा लागेल असे सांगितले. यासंदर्भात पुण्याला पाठविताना डॉ. कोकरे यांनी दुसर्‍या हॉस्पिटलचे पत्र दिले. संबंधित डॉक्टरांनी माझ्या मुलाचे चुकीचे ऑपरेशन केल्याने त्याचा पाय कापावा लागला. त्याला शारीरिक अपंगत्व आले आहे, असा आरोप केला आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी सातारा, पोलीस अधीक्षक सातारा यांच्यासह महाराष्ट्र शासन आरोग्य मंत्री यांच्याकडे दाद मागितली आहे. यासंदर्भात आम्हाला न्याय न मिळाल्यास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या दालनासमोर २६ जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशाराही मुलाचे वडील संतोष राऊत यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!