बाबा जीवनी आधार; प्रिय आबा वडील मायेची सावली जिच्या सावलीत वाढलो खेळलो,रडलो कितीदा शिकवणीत त्यांच्या घडलो वडील असे आमचे आबा खाऊन शिळी भाकरी प्रामाणिकपणे केली पोलिस खात्यात चाकरी तुटपुंज्या पगारात संसार गाडा चालविला कामावरून येताना खाऊ आमच्या साठी आणिला मुलींना उच्च शिक्षित करुनी फुलांसमान वाढविले मुलगा मुलगी ना मानिला भेद उत्तम माणूस घडविले करुनी मुलींची लग्न पार पाडली कर्तव्य ज्यांनी अजूनही करतात खुप नात्यांसह माणुसकी जपली त्यांनी पंच्याहत्तरी साजरी केली ऐंशीत आनंद मिळो तुम्हा नवनवा मिळो शतायुष्य तुम्हा बाबा जीवनी आधार तुमचा हवा वडील रुपी झर्याचे पाणी कधीही संपत नाही त्यांच्या उपकार,कर्तव्याचे ॠण कधीही फेडता येत नाही येणार नाही प्रतिभा मधुकर जाधव फलटण, सातारा. ८८०५०९१०७६