मालवणमध्ये पोलिसांवर जीवघेणा हल्ला, पाच पोलीस जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सिंधुदुर्ग, दि. 15 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील वायरी लुडबेवाडी येथे दोन भावांपासून त्रास असल्याची तक्रार आल्याची चौकशी करण्यासाठी गेलेल्या  पाच पोलिसांना मारहाण करून  जखमी जखमी केले अहे. या सर्वांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन भावांपासून त्रास होत असल्याने शेजाऱ्यांनी याची तक्रार मालवण पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. या तक्रारीच्या चौकशी अर्जासाठी पोलीस घटनास्थळी गेले होते. मात्र तेथे पोलीस पथकावर लोखंडी शिगा आणि विटा घेऊन दोघांनी जीवघेणा हल्ला केला. सोमवारी 15 जून रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास वायरी लुडबेवाडी येथे ही घडली आहे. यावेळी झालेल्या झटापटीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह पाच कर्मचारी जखमी झाले आहेत.

मालवणमधील वायरी लुडबेवाडी येथील मोहन अनंत लुडबे आणि विवेक अनंत लुडबे या दोन भावांविरोधात नजीकच्या रहिवाशांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या चौकशीसाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास टेंबुलकर आणि डी. व्ही. जानकर हे अर्जदारांना भेटायला गेले होते. त्यावेळी मोहन आणि विवेक यांनी पोलिसांवर लोखंडी शिगा आणि विटा घेऊन अचानक हल्ला चढवला. त्यावेळी अतिरिक्त पोलीस कुमक येथे मागवण्यात आली.

यावेळी झालेल्या झटापटीत पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह हेड कॉन्स्टेबल डी. व्ही. जानकर, विलास टेंबुलकर, सिद्धेश चिपकर, मंगेश माने आणि दिलीप खोत यांना दुखापती झाल्या आहेत. यातील हेड कॉन्स्टेबल डी. व्ही. जानकर याना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्याला पाच टाके घालण्यात आले आहेत. त्यांच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालवण पोलीस अधिक तपास करीत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!