
दैनिक स्थैर्य | दि. १० ऑगस्ट २०२३ | सातारा |
सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथे आज सकाळी ६.०० वाजता चारचाकी गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चारजण ठार झाले तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.
खटाव तालुक्यातील बनपुरी आणि सिध्देश्वर कुरोली येथील एकूण आठजण देवदर्शनासाठी निघाले होते. दहिवडी-मायणी रस्त्यावरील सूर्याचीवाडी येथे पहाटे ६.०० वाजता सदर गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात एक पुरूष आणि दोन महिला जागीच ठार झाल्या. जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, उपचार सुरू असताना वडूज येथील रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये दहिवडी येथील एका प्रवाशाचा समावेश आहे.