दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
रक्षक रयतेचा न्यूज, श्री गगनगिरी ज्वेलर्स, फलटण आणि नृत्यकला अकॅडमी, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय संस्कृती जपणारा महिलांचा चळीी/चअॅी ढअॅरवळींळेपरश्र इशर्रीीूं २०२४ स्पर्धा (फॅशन शो) अतिशय उत्साहामध्ये पार पडला.शेवटपर्यंत रंगलेल्या व अटीतटीच्या या स्पर्धेत महिला गटातून सौ. नीता चांगण तर युवतीच्या गटातून मेघा तुलसे विजेत्या ठरल्या.
रक्षक रयतेचा न्यूज, श्री गगनगिरी ज्वेलर्स, फलटण आणि नृत्यकला अकॅडमी, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी फलटण, अरिहंत टीव्हीएस फलटण, शांताई कलेक्शन फलटण, जावेद हबीब हेअर ब्युटी फलटण, नाकोडा भांडी स्टोर फलटण, नसरीन मेहंदी यांच्या सहकार्याने येथील महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे महिला व युवतींसाठी चळीी/चअॅी ढअॅरवळींळेपरश्र इशर्रीीूं २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भारतीय संस्कृतीशी निगडित सौंदर्य वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. सदर स्पर्धामध्ये सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील महिला व युवतीं मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन दीपप्रज्ज्वलनाद्वारे के.बी. उद्योग समूहाच्या संचालिका सौ. सुजाता सचिन यादव यांच्या हस्ते व श्री गगनगिरी ज्वेलर्सचे प्रमुख रवीशेठ शहाणे व त्यांच्या पत्नी मोनाली शहाणे, अरिहंत टीव्हीएसचे स्तवन गांधी, सौ. कल्पनाताई देशमुख, सौ. मेघा देशमुख, राहुल देशमुख, नृत्यकला अकॅडमीचे प्रशांत भोसले स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या परीक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सौ. सुजाता यादव यांनी आपल्या भाषणामध्ये फलटणमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात अशा स्पर्धेचे आयोजन रक्षक रयतेचा व त्यांच्या टीमने अत्यंत चांगल्या पद्धतीने केले आहे. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रक्षक रयतेचा हे चांगले व्यासपीठ असून या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात युवती व महिलांनी सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. आगळ्यावेगळ्या या स्पर्धेमुळे महिलांना चांगले प्रोत्साहन मिळणार असून यापुढील काळातसुद्धा के.बी. उद्योग समूहाचे माध्यमातून आमचा मदतीचा मोठा वाटा रक्षक रयतेचा बरोबर असणार आहे. प्रत्येक कार्यक्रमाला आमचा सहभाग असेल, अशी ग्वाही देऊन सौ. सुजाता यादव यांनी के. बी. उद्योग समूह व गॅलेक्सी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्यामार्फत राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या ठिकाणी महिलांनी भेट देण्याचे आमंत्रण सुद्धा त्यांनी सर्वांना दिले.
स्पर्धेसाठी विवाहित व अविवाहित असे दोन वेगवेगळे गट करण्यात आले होते. दोन्ही गटासाठी स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली होती.
प्रथम क्रमांकासाठी : गोल्डन क्राऊन
द्वितीय क्रमांकासाठी : फॉर्मिंग नेकलेस
तृतीय क्रमांकासाठी : पैठणी व आकर्षक गिफ्ट
बेस्ट वेशभूषेसाठी : आकर्षक पैठणी
बेस्ट फोटोजनिक फेससाठी : आकर्षक गिफ्ट
ठेवण्यात आले होते.
या शोमध्ये भारतीय संस्कृतीशी निगडित विविध प्रकाराच्या पेहराव सादर करण्यात आले. परिक्षक म्हणून महाराष्ट्रात विविध शोमध्ये यश मिळवलेल्या नामांतिक अशा पौर्णिमा अंबरगे, संजना दुधाळ, रुपाली कचरे, गुंजन चावला यांनी काम पाहिले.
तब्बल सात तास चाललेल्या व शेवटपर्यंत श्वास रोखून धरायला लावणार्या या स्पर्धेमध्ये मुलींमध्ये प्रथम क्रमांक मेघा प्रकाश तुलसे, द्वितीय क्रमांक प्रणाली हनुमंत भोसले, तृतीय क्रमांक मयुरी सुनील शेवते, बेस्ट ड्रेपरी हर्षल ज्ञानेश्वर गायकवाड, बेस्ट फोटोजनिक शरयू शशिकांत भोसले, महिला गटामध्ये प्रथम क्रमांक सौ. नीता किरण चांगण, द्वितीय क्रमांक सौ. राजश्री विनीत जाधव, तृतीय क्रमांक सौ. तेजस्विनी योगेश रणपिसे, बेस्ट ड्रेपरी सौ. भाग्यश्री मयूर देशपांडे, बेस्ट फोटोजनिक फेस सौ. अक्षदा अक्षय मुळीक यांनी मिळविला आहे.
आकर्षक पेहराव असलेल्या मॉडेल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. स्पर्धेसाठी उत्कृष्ट रॅम्प उभारण्याबरोबरच आकर्षक विद्युत रोषणाई व साऊंड सिस्टिम ठेवण्यात आली होती.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रक्षक रयतेचा इव्हेंट टीमच्या सदस्या सौ. नेहा ठाकूर, सौ. नंदा बोराटे, नीता जोशी, सौ. रुपाली कचरे, सौ. मनीषा घडिया, सौ. अनुराधा रणवरे, सौ. लता बोराटे, सौ. नसरीन शिकलगार, सौ. असिफा शिकलगार, नृत्यकला अकॅडमीचे प्रमुख प्रशांत भोसले, रक्षक रयतेचा न्यूजचे कार्यकारी संपादक राजू बनसोडे, उपसंपादक शशिकांत आढाव, उपसंपादक उद्धव बोराटे, प्रशांत धनवडे, इम्तियाज तांबोळी, कमलेश भट्टड, तात्यासाहेब गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी केबी उद्योग समूहाचे संचालक सचिन यादव, श्री गगनगिरी ज्वेलर्सचे प्रमुख रवीशेठ शहाणे, अरिहंत टीव्हीएसचे मंगेशशेठ दोशी, शांताई कलेक्शनचे अतुल निंबाळकर, जावेद हबीब, हेअर अँड ब्युटीचे हेमंत जाधव, नाकोडा भांडी स्टोरचे हेमंत गांधी, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे यांचे अनमोल सहकार्य लाभले.
श्री गगनगिरी ज्वेलर्सतर्फे कार्यक्रमात भाग घेतलेले सर्व स्पर्धक व स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. शांताई कलेक्शन आणि इंद्राक्षी कलेक्शनतर्फे उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ द्वारे दोन महिलांना पैठणी भेट देण्यात आली.
नृत्यकला अकॅडमी, फलटणच्या विद्यार्थिनींनी यावेळी आपल्या विविध कलाकृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
स्वागत रक्षक रयतेचा न्यूजचे संपादक नसीर शिकलगार, प्रास्ताविक सौ. नंदा बोराटे यांनी केले. उत्कृष्ट सूत्रसंचालनाद्वारे प्रसिद्ध निवेदक आनंद पवार यांनी उपस्थितांची मने जिंकली, तर आभार रक्षक रयतेचा वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक राजू बनसोडे यांनी मानले.