दैनिक स्थैर्य । दि.०२ मे २०२२ । सातारा । दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदीसाठी अनेक समस्या निर्माण हेातात. अनेक दुकानदार साठा करुन चढ्या दराने खत विक्री करण्याचा प्रयत्न करतात. याला आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांना एका क्लिकवर कोणत्या दुकानदाराकडे कोणते खत उपलब्ध आहे याची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील रासायनिक खतांचा साठा संबंधित संकेतस्थळावर कृषी विभागाने तयार केले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना खते खरेदी करताना येणाऱ्या अनेक अडचणी दूर होणार आहेत. शेतकऱ्यांना Satarazpkrushivihagmh11 या संकेतस्थळावर गेल्यावर एका लिंकवर क्लिक केल्यावर त्याठिकाणी तालुक्यामध्ये कृषि सेवा केंद्राची यादी दिसणार आहे. त्यावर कोणत्या दुकानदाराकडे किती खताचा साठा उपलब्ध आहे याची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
हे संकेतस्थळ कृषी आयुक्त धीरजकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर व मोहिम अधिकारी दत्तात्रय येळे यांनी तयार केले आहे.
कसा पाहणार खतांचा साठा
साठा पाहण्याकरिता आपणाकडे Google sheet असणे गरजेचे आहे. Play store मधून Google sheets download करुन घ्यावी. त्यानंतर संपूर्ण लिंक कॉपी करावी व open with google sheets करावे. तद्नंतर Select gmail Accunt करावे त्यानंतर आपणास माहिती पाहता येईल.