
दैनिक स्थैर्य । 4 एप्रिल 2025। सातारा । 1 एप्रिल 2025 पासून राज्यातील सर्व गावामध्ये ई पीक पहाणी उन्हाळी हंगाम 2025 सुरु करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2025 पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅपद्वारे पिक नोंदणी करावयाची आहे. शेतकरी स्तरावरील ई पिक पहाणी 1 एप्रिल ते 15 मे व सहायक स्तरावर ई पिक पहाणी 16 मे 29 जून असा निश्चीत करण्यात आलेला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.
शेतकरी स्तरावरून मोबाईल अॅपद्वारे ई-पीक पाहणी नोंद करण्यात येते व शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर सहायकांमार्फत उर्वरित शेतक-यांची पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे द्वारे नोंदवण्यात येते. तसेच डिजीटाल क्रॉप सर्व डीसीएसमध्ये गटाच्या हद्दीवर आधारित ॠशे ऋशपलळपस बंधनकारक करण्यात आलेली आहे. डिजीटल क्रॉप सर्वे हा ग्री स्टक या प्रकल्पासाठी तयार करावयाचा हंगामी पिकांचा माहिती संच साठी उपयोगात येणार आहे.
या हंगामी पिकांचा माहिती संच हा राज्यातील सर्व कृषक जमिनींच्या पिक पाहणी संदर्भात 100% पिक पाहणी व शेताच्या बांधावर जाऊन फोटो काढून पीक पाहणी ही या प्रकल्पाची वैशिष्टये आहेत. या दोन्ही बाबी पुर्ण होण्यासाठी राज्यभरात प्रत्येक गावात सहायकाची नेमणूक करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. ई-पिक पाहणीसाठी सहायक म्हणून कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, व ग्रामस्तरीय मानधनावर कार्यरत इतर विभागाचे कर्मचारी यांच्यापैकी प्रत्येक गावासाठी एका सहायकाची नियुक्ती संबंधित तालुक्याचे तहसिलदार करणार आहेत.तसेच चू इहरीरीं पोर्टलवर नोंदणी केलेल्या नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक यांची मदत सहायक म्हणून डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅप द्वारे पीक पाहणी करणे करिता घेता येणार आहे.
दिनांक 1 एप्रिल 2025 पासून उन्हाळी हंगामातील ई- पिक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅपद्वारे नोंदविता येणार आहे. दिनांक 1 एप्रिल 2025 ते 15 मे 2025 या कालावधीमध्ये शेतकर्यांना प्रोत्साहित करुन त्यांचेकडून एकूण शेतांच्या किमान 60% पीक पाहणी करुन घेणे ही सहायकाची जबाबदारी असणार आहे. एका सहायकाला जास्तीजास्त 1500 ओनर्स प्लॉट संख्येपर्यंत पीक पाहणीसाठी सहाय्य करणे व उर्वरित पीक पाहणी नोंदविणे हे कामकाज देण्यात येणार आहे.सहायक नेमणूक केल्यानंतर सहायक म्हणून काम करण्यासाठी संबंधित कर्मचारी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅपद्वारे दिनांक 16 मे 2025 ते 29 जून 2025 या कालावधीत पीक पाहणी नोंदवू शकतील. या कालावधीत उर्वरीत सर्व क्षेत्राचे पिक पाहणीच्या नोंदी सहायक यांनी पुर्ण करावयाच्या आहेत.
शेतकरी स्तरावरील पीक पाहणी कालावधीमध्ये शेतकर्यांना पीक पाहणीसाठी मदत करणे व त्यांना येणार्या अडचणी सोडवणे, शेतकरी स्तरावरील पीक नोंदणी कालावधी संपल्यानंतर उर्वरित शेतक-यांची पीक नोंदणी सहायक मोबाईल अॅपद्वारे सहायक यांनी 100% पुर्ण करावयाची जबाबदारी सहायक यांची आहे. जे शेतकरी ई-पीक पाहणी -अॅपमधून पिकांची नोंद करणार नाहीत त्यांना कोणतेही पिकांच्या संदर्भात अनुदान मिळणार नाही त्यामुळे जास्तीजास्त शेतकरी यांनी आपली पीकांची नोंद डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅप द्वारे शेतकरी लॉगिन मधून विहीत कालावधीत करावी, असे आवाहनही उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी केले आहे.