कोयना पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी थकीत पाणी पट्टी भरण्याचे आवाहन


 स्थैर्य, 17 मार्च, सातारा : कोयना पाटबंधारे विभागाचे कार्यक्षेत्रातील कोयना, तारळी, उत्तरमांड, उत्तरवांग, वांग व को.प. लघू पाटबंधारे प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी वापरणाऱ्या  लाभधारक शेतकऱ्यांनी सिंचनासाठी वापरलेल्या पाण्याची थकीत पाणीपट्टी संबंधित शाखा कार्यालयात भरणा करुन त्याची रितसर पावती घ्यावी. थकबाकीदार शेतकरी, संस्था यांना त्यांचेकडील थकीत पाणीपट्टी रक्कम भरणा करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावरुन लेखी नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. ज्यांना नजर चुकीने नोटीस मिळाली नसेल त्यांनी संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क साधून त्यांचे थकबाकीचा तपशील उपलब्ध करुन घ्यावा व त्यानुसार पाणीपट्टी रक्कम भरणा करुन त्याची रितसर पावाती घ्यावी.

पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी ज्या संस्था,शेतकरी यांना नोटीसा बजावून तसेच वेळोवेळी मागणी करुन पाणीपट्टी वसुलीस प्रतिसाद देणार नाहीत त्यांचा भविष्यात कोणतीही पूर्व सूचना न देता महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ मधील कलम ४९ (ज) नुसार विद्युत पंपांना सील करुन पाणी पुरवठा खंडीत केला जाईल. थकबाकीसाठी पाणी पुरवठा खंडीत केल्यानंतर होणाऱ्या उभ्या पिकाचे नुकसानीस महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही.  कारवाई टाळण्यासाठी सर्व थकबाकीदार संस्था, शेतकरी यांनी त्यांच्याकडील सर्व थकीत पाणीपट्टीची रक्कम भरणा करुन जलसंपदा विभागास पाणीपट्टी वसुलीसाठी सहकार्य, असे आवाहन कोयना सिंचन विभागाच्या उपकार्यकारी अभियंता यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!