![](https://i0.wp.com/sthairya.com/wp-content/uploads/2025/02/Bhambure.jpg?resize=709%2C354&ssl=1)
दैनिक स्थैर्य | दि. १६ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फरांदवाडी कृषी क्रांती अॅग्रो प्रोड्युसर कंपनी व आयोध्या फूडस् कंपनी, फलटण यांचे संयुक्त विद्यमाने फरांदवाडी येथे धान्य ग्रेडिंग युनिट व गहू पीठ (आटा) केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा, असे अवाहन ज्येष्ठ पत्रकार व कृषी क्रांती कंपनीचे चेअरमन सुभाष भांबुरे यांनी केले आहे.
धान्य प्रतवारी केंद्रामार्फत शेतकर्यांना सर्वप्रकारचे धान्य ग्रेडिंग ९०/- रुपये प्रति क्विंटल व १६०/- रुपये घरपोच सेवा देण्यात येणार आहे. तसेच गहूपीठ एक किलो, दोन किलो व पाच किलोमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. या दोन्ही केंद्रांचा लाभ शेतकरी व ग्राहकांनी घ्यावा, असे भांबुरे यांनी म्हटले आहे.
यावेळी कृषी क्रांती कंपनीचे संस्थापक दत्तात्रय राऊत, मार्गदर्शक राजेंद्र राऊत, संचालक अश्विनी राऊत, आर्थिक सल्लागार बाळासो राऊत, अरुण राऊत, दिलीप दळवे तसेच आयोध्या फूडस् कंपनी फलटणचे प्रोप्रा. मृणाल पोरे, प्रियांका पोरे, किरण पोरे, धनश्री पोरे, तेजस पोरे उपस्थित होते.