
दैनिक स्थैर्य । दि. २१ मार्च २०२२ । फलटण । तालुक्यातील फरांदवाडी येथील फरांदवाडी कृषी क्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनीच्या ग्रेडिंग युनिटचा शुभारंभ करण्यात आला आहे. तरी धान्य ग्रेडिंग युनिटचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन फरांदवाडी कृषी क्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन सुभाष भांबुरे यांनी केलेले आहे.
फरांदवाडी कृषी क्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे, संस्थापक दत्तात्रय राऊत, आर्थिक सल्लागार बाळासो राऊत, संचालक मेघराज बोराटे, कपिल राऊत, मार्गदर्शक ज्ञानेश्वर भोसले, राजेंद्र राऊत, विकास फरांदे, अरुण राऊत, व्यवस्थापक विजय राऊत, सभासद धनंजय घनवट, ग्रेडिंग युनिट व्यवस्थापक मनोज शिंदे, गणेश दळवे व शेतकरी उपस्थित होते.
तरी शेतकऱ्यांनी मनोज शिंदे (9309102323) व गणेश दळवे (9890111188) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फरांदवाडी कृषी क्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन सुभाष भांबुरे यांनी केलेले आहे.