दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । फलटण । ऊस पिकातील सुरू हंगामातील व गुळासाठी प्रसिद्ध असलेला फुले ०९०५७ या वाणाची सुधारित लागवड तंत्रज्ञान व ९.५ महिन्यात ३२ कांड्या झालेला ऊस विंचुर्णी रोड, जाधववाडी येथील ऊस प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भोसले यांच्या शेतीतील प्रत्यक्ष अनुभव, प्रक्षेत्र भेट व शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऊस लागवड तंत्रज्ञान व मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण आणि श्रीमंत शिवाजीराजे कृषि विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब भोसले, विंचुर्णी रोड, जाधववाडी, व विक्रांत कदम, साठे फाटा, ता. फलटण या ऊस प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर एक दिवसीय प्रक्षेत्र भेट व शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी भूषविले. फलटण व परिसरातील ऊस शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र व शिवार फेरीच्या माध्यमातून ऊस शेतीतील लागवड तंत्रज्ञान, प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव, तज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, फलटण भागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ऊस प्रगतशील शेतकरीश्री. बाळासाहेब भोसले यांनी सदरील ऊस लागवड तंत्रज्ञानाचे सविस्तर मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले.
कराड अर्बन बँकचे व्यवस्थाकी दीपक पोरे यांनी सहकारी बँकेचा शेतकऱ्यांना असणारे शेतीसाठी सहकार्य, शेतीसाठी अनुदानित योजना या विषयावर शेतकऱ्यांना अनुमोदन केले. यानंतर ऊस पिकातील ४.५ फुट सरी व १.५ फुट रोपातील लागवड आंतर तसेच एकरी ८५ टन उत्पादन साध्य करणारे विक्रांत कदम, साठे फाटा, ता. फलटण यांच्या शेतीवर प्रक्षेत्र भेट व शिवार फेरी घेण्यात आली.
ऊस पिकातील ४.५ फुट सरी व १.५ फुट अंतरावरील लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्यांचा योग्य वापर, पाचट व्यवस्थापन या संदर्भात शेतकऱ्यांनी प्रक्षेत्र भेट व शिवार फेरिव्दारे ऊसाचे लागवड तंत्रज्ञान अवघत केले. या प्रसंगी कृषि विभागाचे कुलदीप नेवसे, कृषि सहायक, बरड मंडळ यांनी कृषि विभागाच्या शेतकऱ्यांसाठी डीबिटी द्वारे असणाऱ्या कृषि योजना, कृषि यांत्रिकीकरणाचे ऊस शेतीतील महत्त्व या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रक्षेत्र भेट व शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ऊस पिकाचे भरघोस उत्पन्न घ्यावे असे आवाहन केले. तसेच ऊस पिकातील असणारे सक्षम लागवड तंत्रज्ञान, प्रक्षेत्र भेट व शिवार फेरीचे महत्व, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण आणि श्रीमंत शिवाजीराजे कृषि विकास मंच यांचे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी करत असलेले कार्य व महाविद्यालयातील कृषि विकासात्मक प्रकल्प या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
ऊस प्रक्षेत्र भेट व शिवार फेरी या कार्यक्रमासाठी कृषि विभागाचे माजी तालुका कृषि अधिकारी बरकडे, आदेश करे, कृषि पर्यवेक्षक, तरडगाव मंडळ, सचिन जाधव, कृषि सहायक, सासकल, महाविद्यालयातील डॉ. पी. एस. खरात, मेटकरी, डॉ. जी. बी. अडसूळ, शेती विभागाचे राजेंद्र पवार, फलटण परिसरातील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब गुंजवटे, कल्याण काटे, भाऊ भोसले, मुकुंद धनवडे, आवाडे, पराग कोठारी, बाहुबली शहा व इतर शेतकरी उपस्थित होते.