स्थैर्य, म्हसवड (जि सातारा), दि.२०: दुष्काळी माण तालुक्यातील भाटकी येथील गोरखतात्या शिर्के यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत जून महिन्यात गोल्ड स्पॉट या संकरीत जातीच्या झेंडूची दोन एकरातील सीताफळ बागेत अंतरपिक म्हणून लागवड केली आहे.
विजया दशमी व दीपावलीस बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची मागणी अधिक असते. यंदाच्या या दोन्ही सणास शंभर ते एकशे दहा रुपये किलो दराने सुमारे पाच टन झेंडूच्या फुलांची विक्री करुन आतापर्यंत साडेपाच लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. यापुढेही आणखी सहा ते सात लाखांचे खात्रीशीपणे उत्पन्न मिळेल, असा ठाम आत्मविश्वास गोरखतात्या शिर्के यांनी व्यक्त केला. शिर्के यांची म्हसवड पासून पाच किलोमीटर अंतरावरील भाटकी या गावी पंधरा एकर शेती आहे. या शेतीत ते गहू, बाजरी, मका, ज्वारी, हरभरा व उसाचे पारंपरिक पिके घेत असतात.
बाजारात कोथिंबिरीला कवडीमोल भाव; हताश शेतकऱ्याने पिकावर फिरविला रोटर