दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालय रेठरे बुद्रुक, कराड यांच्या अंतर्गत कृषीकन्या कु. श्रद्धा आनंदराव काळुखे आणि कु. सुप्रिया नामदेव हिरवे यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रम व ग्रामीण जागरूकता कार्यक्रम 2021 – 2022 अंतर्गत विडणी येथील शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम गावातच राबविला जात आहे.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तज्ञांच्या व कृषी मार्गदर्शकांच्या सल्ल्याने मार्गदर्शन करीत आहेत. यामध्ये ठिबक सिंचन या पिकाला पाणी देण्याच्या आधुनिक पद्धतीची माहिती विद्यार्थीनींनी प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना दिली.
या उपक्रमासाठी कृषीकन्या कु. श्रद्धा आनंदराव काळुखे आणि कु. सुप्रिया नामदेव हिरवे यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. जाधव सर, कार्यक्रम प्रमुख प्रा. भिलवडे सर , प्रा. एन. पी. पाटील व इतर शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.