दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२३ | फलटण |
कृषी महाविद्यालय फलटणच्या विद्यार्थिनींनी पिंपरद येथील शेतकर्यांना पिक उत्पादन तंत्रज्ञान माहिती मिळवण्यासाठी अॅप्सचे ज्ञान आणि वापर यावर प्रात्यक्षिक दिले.
फलटण एज्युकेशन संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील विद्यार्थिनींनी पिंपरद येथे पिक उत्पादनसंबंधी विविध अॅप्सचे ज्ञान आणि त्यांचा वापर, याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. पिंपरद गावच्या सरपंच स्वाती भगत व गावातील शेतकर्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवली.
या कार्यक्रमासाठी १६ शेतकरी उपस्थित होते. त्यांना कृषीकन्यांनी विविध अॅप्सची माहिती चार्टद्वारे दिली. त्यामध्ये अॅग्रोस्टार, अॅग्रीअॅप, अपनी खेती, क्रॉपवाईज ग्रोवर, भारत अॅग्री, प्लांटिक्स, इन्शुरन्स, अॅग्रोनॉमिक प्लॅटफॉर्म, बीगमार्ट इत्यादी अॅप्सचा समावेश होता. तसेच कृषीकन्यांनी शेतकर्यांच्या मोबाईलमध्ये अॅप्स डाऊनलोड कसे करावे व त्याचा वापर करून शेतीचा विकास जलद गतीने कसा करावा, हे सांगितले आणि या अॅप्सचे दैनंदिन शेतीच्या वापरासाठी महत्त्व शेतकर्यांना पटवून दिले.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ.यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित मॅडम व प्रा. धायगुडे सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कृषीकन्या निशिगंधा खुडे, आरती जाधव, आर्या जाधव, समृद्धी जगताप, अक्षदा जाधव, प्रणिता गोडसे, प्रतीक्षा जगताप प्रात्यक्षिक यशस्वीरीत्या पार पाडले.