दैनिक स्थैर्य | दि. २४ डिसेंबर २०२४ | फलटण |
पाडेगाव, ता. खंडाळा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणमधील चतुर्थ वर्षातील कृषीदूतांनी ग्रामीण जागरुकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२४-२५ अंतर्गत किसान क्रेडिट कार्ड व पीककर्ज याबद्दल माहिती सांगितली.
पिंपरेमधील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये कृषिदूतांनी भेट दिली व शेतीविषयक कर्ज व पीककर्ज योजनेबद्दल माहिती घेतली, तसेच कर्जाबद्दल जास्तीत जास्त शेतकर्यांना माहिती सांगितली. तेथे बँक मॅनेजर, विकास अधिकारी व इतर सदस्य यांच्या उपस्थितीत कृषीदूत इंगोले धनंजय, केसकर राहुल, कांबळे रोहन, धुमाळ श्रीजित, काटकर सौरभ, रनवरे शिवतेज, गोडसे आदित्य यांनी हा कार्यक्रम राबविला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे व प्रा. नितीशा पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.