दैनिक स्थैर्य | दि. २० सप्टेंबर २०२३ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित, कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीकन्यांनी फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठाचीवाडी येथे शेतीतील उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी उपयुक्त अशा ‘अॅप्स’चा वापर कसा करावा, याविषयी विस्तारित माहिती दिली. हे अॅप्स कसे डाऊनलोड करावेत व कसे चालवायचे, याविषयी प्रत्यक्ष डिजिटल टीव्हीद्वारे माहिती दिली.
यावेळी कृषिकन्यांनी ई-नाम मोबाईल अॅप, मार्केटयार्ड अॅग्रीसोलुशन्स, इफको किसान, बिजक अॅप, हॅलो कृषी अशा विविध अॅप्सची माहिती दिली. यावेळी मठाचीवाडी गावातील शेतकरी तसेच मठाचीवाडी गावाचे कृषी सहाय्यक श्री. बोडके सर उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या समृद्धी मोहिते, समृद्धी कुंजीर, पूजा मारवाडी, समृद्धी उल्हारे, प्राजक्ता ननावरे, हर्षदा लोखंडे, साक्षी शिंदे व शिवांजली धुमाळ यांनी शेतीतील उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी उपयुक्त अशा अॅप्सबद्दल माहिती दिली.