दैनिक स्थैर्य | दि. २२ सप्टेंबर २०२३ | फलटण | फलटण तालुक्यातील मठाचीवाडी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीअंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत पिकावरील रोगाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच पिकाला लवकरात लवकर परिपक्वता येण्यासाठी विविध प्रकारच्या बीजप्रक्रिया कृषी कन्यांमार्फत करून दाखवण्यात आल्या.
यावेळी कृषीकन्या समृद्धी मोहिते, शिवांजली धुमाळ, साक्षी शिंदे, हर्षदा लोखंडे, समृद्धी उल्हारे, प्राजक्ता ननावरे, पूजा मारवाडी, समृद्धी कुंजीर यांनी ज्वारी या पिकावरील धान्य काणी (ग्रेन स्मट) नियंत्रण करण्यासाठी कार्बेंडाझीम ( बाविस्टीन) च्या बीजप्रक्रियेविषयक माहिती दिली. यावेळी मठाचीवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा.स्वप्निल लाळगे व प्रा. नितिशा पंडित व प्रा. पी. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्यांनी शेतकर्यांना बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक दिले.