
दैनिक स्थैर्य । दि. २१ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गिरवी गावांमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृषी कन्या मोनिका बत्ते , भाग्यश्री बुरुड, समृद्धी नकाते ,संजीवनी पेंडाळे, सिमरन तांबे , स्नेहल तांबे व अंकिता वायसे यांनी शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले . विद्यार्थ्यांना बक्षीस व खाऊ वाटप करून बालदिनाचा आनंद साजरा केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सिताराम सुतार व शिक्षक सीमा उत्तम भोईटे , पुनम दिगंबर गायकवाड, राजेंद्र नानासाहेब वाघ उपस्थित होते.