अनूसूचित जाती – जमाती प्रवर्गातील शेतकर्‍यांनी कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घ्यावा : श्रीमंत शिवरुपराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 14 सप्टेंबर 2021 । फलटण । डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2021 – 22 साठी फलटण तालुक्यातील अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील पात्र शेतकर्‍यांकडून फलटण पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून पात्र शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना नवीन सिंचन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, कृषीपंपसंच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण व सूक्ष्म सिंचन संच देण्यात येणार आहे. नवीन विहीरीचा लाभ घेण्यासाठी स्वत:च्या नावे कमीत कमी 0.40 हेक्टर म्हणजे 1 एकर इतके क्षेत्र असणे आवश्यक आहे. तसेच इतर बाबींचा लाभ घेण्यासाठी 0.20 हेक्टर म्हणजे अर्धा एकर क्षेत्र असणे आवश्यक आहे. या बाबींचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना खाते उतारा, सर्व सातबारा उतारे, सक्षम अधिका्रयांचा जातीचा दाखला, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी), आधार कार्ड, बँक पासबुक, ग्रामसभेचा लाभार्थी निवडीचा ठराव, निवड झालेल्या बीबासाठी यापूर्वीचा लाभ घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र इत्यादी कागदपत्रासह महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर व गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे यांनी केले आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी पात्र शेतकर्‍यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषी अधिकारी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!