शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 22 : कोविड-19 मुळे सातारा जिल्ह्यातील विविध उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत. येथील मजुरांना तसेच विविध शहरातून सातारा जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत झालेल्या काही मजुरांना रोजगार नाही. या मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोगार हमी योजनेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होवु शकतो. यासाठी कृषी विभागामार्फत फळबाग लागवड गांडुळ युनिट, नॅडेप कंपोष्ट युनिट, शेततळे या घटकाच्या माध्यमातुन मजुरांना काम देता येणे शक्य आहे. ही योजना केंद्र शासनाची असून वर्षात एका कुटुंबाला 100 दिवसाचा रोजगार देण्यात येतो. दि.  1 एप्रिल पासून प्रती दिवस मजुरीचा दर 238/- रुपये इतका झालेला आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी गावपातळीवर कृषि सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी  यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!