दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२१ | फलटण | महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर अंतर्गत कृषीकन्या नेहा बाळू भंडलकर यांनी साखरवाडी (ता.फलटण) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांतर्गत त्यांनी हमजु हरुण मुलाणी यांच्या यशस्वी कारकीर्दीचा आाढावा घेतला.
यावेळी हमजु मुलाणी यांनी सांगितले की, ‘‘सन 2010 साली आपण 1 गाय विकत घेवून दुग्धव्यवसायाला सुरुवात केली. एका गायी पासून मिळणार्या दूधाच्या नफ्यातून 4 गायी विकत घेतल्या. पुढे दिवसेंदिवस व्यवसायात वाढ होवून आज एच.एफ., देशी, गीर अशा 10 गायी आपल्याकडे आहेत. यातून दिवसाला 100 लिटर दूध निघत असून या गायींवर दरमहा 20 हजार खर्च जावून 50 हजार एवढा निफा मिळतो.’’
‘‘दुग्धव्यवसायातून मिळणार्या नफ्यातून आपण ट्रॅक्टर खरेदीकरुन दुसर्या उद्योगधंद्यालाही सुरुवात केली आहे. व्यवसायात कष्टाच्या जोडीला प्रामाणिकपणा जपला की यश निश्चीत मिळते’’, असेही हमजु मुलाणी यांनी यावेळी कृषीकन्या नेहा भंडलकर यांना आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या संयोजनासाठी कृषीकन्या नेहा भंडलकर यांना कृषी महाविद्यालय, कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.यु.बी.होले, कार्यक्रम समन्वयक डॉ.बी.टी.कोलगणे, प्रा.मेमाणे यांचे मार्गदर्शन लाभले.