पाटोळे खडकीत सर्प दंशाने शेतकरी मृत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, म्हसवड, दि. १२ : पाटोळ खडकी ता. माण येथील महादेव तात्याबा साळुंखे वय ४८ यांचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाला.

पाटोळ खडकी ता. माण येथील महादेव तात्याबा साळुंखे वय ४८ यांना काल शुक्रवारी दुपारी तिनच्या दरम्यान जनावरांच्या साठी साठपा करुन ठेवलेल्या वैरणीच्या गंजीतुन हात चालून वैरण काढ़ते वेळी वैरणीत बसलेल्या  विषारी सापाने उजव्या हाताच्या मधल्या बोटाला चावा घेतला.

औषधोउपचारासाठी म्हसवड येथे नेत असताना वाटेतच महादेव सांळुखे यांचा मृत्यु झाला महादेव साळुंखे हे सामान्य कुटुंबातील शेतकरी होते दुष्काळी माण तालुक्यात शेतीला पाणी नसल्याने सुर्वातील काही वर्षे ते मुंबई येथे गोदी मध्ये कामाला होते पत्नीच्या जाण्याने आपल्या दोन मुलांसह पुन्हा ते आपल्या गावी आले व शेती करु लागले होते मुलांचे विवाह झाले असल्याने थोरला मुलगा व सुन मुंबई येथे तर दाखला मुलगा व सुन गावी वडिलांना शेतीत मदत करत होते नेहमी प्रमाणे काल शुक्रवारी दुपारी तिनच्या दरम्यान गोट्यातील जनावरांना साठवून ठेवलेली गंजीतील वैरण उजव्या हाताने काढत असताना उजव्या हाताच्या मधल्या बोटाला गंजीत लपुन बसलेल्या विषारी सापाने जोरदार चावा घेतला औषधोउपचारासाठी म्हसवड येथे आणत आसताना वाटेत वेळेत औषधोउपचार मिळाला नसल्याने  औषधोउपचारा अभावी महादेव साळुंखे यांचा मृत्यु झाला या बाबतची माहिती त्यांचा मुलगा साळुंखे यांनी पोलिसात दिली आसुन अधिक तपास म्हसवड पोलिस ठाणे करत असले तरी महादेव यांच्या जाण्याने पाटोळ खडकी येथे हळ हळ व्यक्त  केला जात.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!