
दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यातील धुळदेव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२०२४ कार्यक्रमाअंतर्गत ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला.
कृषीकन्या सिद्धी शेटे, साक्षी जाधव, समृद्धी जगताप, सिद्धिका कांबळे, स्वेजल पाटील, प्रियांका शिंदे, प्रियांका भोसले व श्वेता सस्ते यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार्या प्रभात फेरीत सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास गावचे सरपंच श्री. नवनाथ भांडवलकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. व्यंकटराव दडस, सदस्य श्री. सचिन महामुनी, सदस्या सौ. उज्वला तांबे, सौ.दिपाली ढगे, सौ. पूजा भिवरकर, सदस्य श्री. वैभव कर्णे, श्री. अर्जुन ननावरे तसेच ग्रामसेवक श्री. व्ही. एल. ढोबळे, गावचे तलाठी श्री. अभिजीत मोरे, कृषी सहाय्यक सौ. सरक व इतर ग्रामस्थ यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.
ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी काढली. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये दिली. काही विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वय प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील लाळगे सर, प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.