
स्थैर्य, फलटण, दि. १९ सप्टेंबर : फलटण नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी आणि पुणे येथे उपायुक्तपदी नियुक्ती झालेले श्री. निखिल मोरे यांचा निरोप समारंभ व फलटण नगरपरिषदेचे नूतन मुख्याधिकारी श्री. निखिल जाधव यांचा स्वागत समारंभ गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या फलटण शहर शाखेच्या वतीने येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. राजू मारुडा यांच्या हस्ते दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. निखिल मोरे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या, तर नूतन मुख्याधिकारी श्री. निखिल जाधव यांचेही शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास फलटण नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे फलटण शहराध्यक्ष श्री. मनोज मारुडा, युवा प्रकोष्ठचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. आनंद डांगे, संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री विनोद मारुडा, चंदूभाई मारुडा, प्रमित डांगे, सुरज मारुडा, सारंग गलीयल, सचिन वाळा, मयुर मारुडा, राहुल डांगे उपस्थित होते.
याशिवाय नवरात्र उत्सव समितीचे श्री. लखन डांगे, श्री. विकी वाळा, श्री. नयन वाळा, श्री. रोहीत मारुडा, श्री. अमन वाळा, श्री. गोपाल वाघेला यांच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहून दोन्ही अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाची माहिती संघटनेचे सचिव श्री. नितीन वाळा यांनी प्रसिद्धीसाठी दिली.