गोस्वामी समाज महासभा च्या वतीने दिलीप सागर यांचा निरोप समारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२३ । नागपूर । अखिल भारतीय गोस्वामी समाज महासभा दिल्ली, संलग्न गोस्वामी समाज महासभा नागपूर च्यावतीने पोलीस निरीक्षक दिलीप सागर आणि त्यांच्या सहचारिणी उमा सागर यांचा बदली निमित्त सपत्नीक सत्कर करून निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोस्वामी समाज महासभेचे अध्यक्ष कृष्णकांत गिरी, तर आशीर्वाद देण्यासाठी महंत सुरजानंद गिरी महाराज प्रमुख उपस्थित होते. विशेष उपस्थित म्हणून नागपूरच्या जॉइंट कमिशनर आदिवासी विभाग बबिता गिरी,वरिष्ठ लेखा अधिकारी कोषागार सतीश गोसावी, पोलीस निरीक्षक वैभव जाधव, गोसावी समाजाचे नेते योगेश बन यावेळी उपस्थित होते. दिलीप सागर यांनी पोलीस विभागात तत्परतेने सेवा देऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवला, अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी सेवा केली असीच सेवा त्यांचे हातून सतत घडत राहो अशा प्रकारची अपेक्षा योगेश बन यांनी व्यक्त केली, सुरजानंद गिरी महाराजांनी गोसावी समाज आणि संप्रदाय त्यांची महत्त्वाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले .बबीता गिरी यांनी प्रशासकीय सेवेत जास्त समाज बांधवांनी यायला पाहिजे त्याकरिता स्पर्धा परीक्षांना प्राधान्य दिले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कृष्णकांत गिरी यांनी समाजाने संघटितपणे समाजाच्या उत्कर्ष व विकास साठी समर्पण भावनेने काम केले पाहिजे असे आवाहन केले. यावेळी वरिष्ठ लेखा अधिकारी सतीश गोसावी यांनी शुभेच्छा दिल्या. दिलीप सागर यांनी नागपूरकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम दिले आणि सहकार्य केले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मंचावर पोलीस निरीक्षक वैभव जाधव, प्राध्यापक राजकुमार गोसावी, गणेश पुरी, मिलिंद भगत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मधुकर गिरी तर आभार प्रदर्शन नुतेश पुरी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री,महेश गिरी,अनिल गिरी,सहील अग्रवाल,गोल्डी सिंग, रीना गिरी, डॉ. रंजना गोसावी, शेखर पुरी,, प्रदीप पुरी, राजेंद्र गिरी, तेजगिर गिरी, बाबा पुरी, गौरव गिरी,सौरभ बन,हेमंत पुरी, मुकेश पुरी,सचिन गिरी, विजेंद्र गिरी, अश्विन गिरी, हेमंत पुरी, साधना बन,अर्चना गिरी, राखी गिरी, साधना गिरी, अश्विनी पुरी,विभा पुरी, मंगला पुरी, सविता गिरी, आदी गोसावी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!