
दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
सासकल (ता. फलटण) येथील शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विनायक मदने म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन करावे व आपल्या शाळेचे व आपल्या आई-वडिलांचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे. शिवशंकर माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता मागील काही वर्षांपासून अतिशय चांगली राहिली आहे. तीच परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन तुम्हा सर्व विद्यार्थ्यांवर आहे. शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीला फळ आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तेव्हा सर्वांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून यश संपादन करावेे.
या कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य श्रीमंतराव घोरपडे, प्राचार्य तथा पंचायत समितीची माजी सदस्य सुभाषराव सोनवलकर यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षा काळामध्ये अभ्यासाचे तंत्र कशा पद्धतीने वापरावे व कोणत्याही विषयाचा पेपर हा पूर्ण करण्यावर विशेष भर द्यावा. तसेच पेपर लिहिताना कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी अनमोल किराणा स्टोअरचे प्रोप्रायटर विठ्ठल मुळीक, पैलवान मा. उपसरपंच दत्तात्रय दळवी, अंगणवाडीच्या मदतनीस दीपाली पवार, अंगणवाडी सेविका पुष्पाताई मुळीक, शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय प्रभू कर्णे, शिक्षक चंद्रकांत शिवाजी सुतार सर, अरुण झगडे सर, वैशाली रमेश सस्ते, गोडसे मॅडम, बाळू ल. सोनवणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्याक जालिंदर बल्लाळसर व विद्यार्थी उपस्थित होते.
गावच्या सरपंच उषाताई राजेंद्र फुले व उपसरपंच सोनाली मंगेश मदने, जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख श्रीमती शारदा देवी कदम, श्री. सह्याद्री कदम यांनीही दूरध्वनीमार्फत विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.