स्थैर्य, फलटण, दि. २१: फरांदवाडी कृषी क्रांती अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे कामकाज कोल्हापूर विभागात उत्कृष्ट असून शेतकरी कृषी कंपन्यांनी शासनाच्या स्मार्ट योजनेत सहभागी होवून कंपनी व शेतकर्यांचा उत्कर्ष साधावा असे आवाहन कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक दशरथ ताभांळे यांनी केले आहे.
फरांदवाडी ता. फलटण येथील फरांदवाडी कृषी क्रांती अॅग्रो प्रोड्युसर कंपनी सदिच्छा भेट प्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक तांभाळे यांनी कंपनीचे कामकाज पाहून समाधान व्यक्त करीत कृषी विकासासाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन देतानाच शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्विकारुन शेती केली पाहिजे अशी अपेक्षा सहसंचालक तांभाळे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या हस्ते 25 शेतकर्यांना रब्बी ज्वारी बियाणे वितरित करण्यात आले. यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, कृषी पर्यवेक्षक पालवे, फरांदवाडी कृषी क्रांती कंपनीच्या चेअरमन सौ. अर्चना राऊत, व्हा. चेअरमन सुभाषराव भांबुरे, सचिव रणजित नाळे, संचालक ज्ञानेश्वर भोसले, व्यवस्थापक विजय राऊत, कृषी खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फरांदवाडी कृषी क्रांती अॅग्रो पोड्युसर कंपनीच्या स्थापनेपासून कंपनीचे सभासद शेतकरी व संचालक मंडळाचा उत्साह आपण प्रत्येक वेळी पाहिला अनुभवला असून आज प्रत्यक्ष कामकाजही उल्लेखनीय आहे. या कंपनीने नव्याने सुरु झालेल्या स्मार्ट योजनेतही आघाडीवर राहुन योजना प्रभावीपणे राबवावी असे आवाहन कृषी सहसंचालक दशरथ दांभाळे यांनी केले आहे.
प्रारंभी सुभाषराव भांबुरे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर विभागीय कृषी सहसंचालक तांभाळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन यथोचित सत्कार केला. प्रास्तविकात कंपनीच्या प्रगतीचा आढावा सादर करुन भविष्यकालीन योजनांविषयी नियोजन केले, समारोप व आभार प्रदर्शन कपील राऊत यांनी केले.