दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । फलटण । कवी अविनाश चव्हाण हे महाराष्ट्रात युवा कवी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि यापूर्वी ते ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी होते तसेच आजवर त्यांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे आणि त्यांच्या याचं कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक संस्थांनी पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या याच साहित्य सेवेची दखल गुगल सर्च इंजिन ने घेतली होती मात्र आता त्यांच्ापाठोपाठ त्यांच्या कवितेची ही दखल गुगल सर्च इंजिन ने घेतली आहे आणि तिचे नाव आहे
” तुझा वेडा ” .
त्यांच्या या कवितेने महाराष्ट्रातील काव्य रसिकांची मने जिंकली आहेत आणि याच कवितेने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये काव्य रसिकांची विशेष दाद मिळवली होती. आता त्यांच्या या ” तुझा वेडा” या कवितेची गुगल सर्च इंजिन ने दखल घेऊन त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे असे म्हणावे लागेल.