प्रसिद्ध युवा कवी अविनाश चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२२ । फलटण । दि. ३ डिसेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ या रोजी नाशिक येथे संपन्न झाले आणि या संमेलनासाठी निमंत्रित कवी म्हणून सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा कवी अविनाश चव्हाण यांना निमंत्रण मिळाले. यापूर्वी १३ सप्टेंबर २००७ रोजी कवी अविनाश चव्हाण यांचा ‘दोन शब्द’ हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले आणि मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू स्वर्गीय डॉ. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची प्रस्तावना लाभलेली आहे. तसेच यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत लिहिले आहे आणि महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे गौरव गीत लिहिलेले आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक कवी संमेलनात आणि साहित्य संमेलनां मध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवून आपला साहित्य क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे आणि त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची ‘तुझा वेडा’ ही प्रेम कविता सर्वदूर प्रसिद्ध आहे आणि याच कवितेने ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात काव्य रसिकांची विशेष दाद मिळवली आहे. त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवरती आहेत त्यापैकी “बळ ” या कविता संग्रहास सिटीझन जस्टिस प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकार तसेच कामगार चळवळीचे जेष्ठ नेते श्री. नागेश भाई सावंत यांची प्रस्तावना लाभलेली आहे तसेच याच पुस्तकाला महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोदजी तावडे आणि महाराष्ट्र्र राज्य विधान परिषदेचे सभापती मा. ना. श्री रामराजे नाईक निंबाळकर आणि राज्यसभेचे खासदार मा. श्री.छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुभेच्छा लाभलेल्या आहेत.

अल्प परिचय

नाव – कवी अविनाश चव्हाण
पत्ता – फलटण जिल्हा सातारा
जन्म दिनांक – १६ सप्टेंबर १९८६
प्रकाशित साहित्य:-
१)दोन शब्द (कविता संग्रह)
२)बळ (सदर काव्य संग्रह प्रकाशित होण्याच्या वाटेवर)
३)तुझा वेडा (सदर काव्य संग्रह प्रकाशित होण्याच्या वाटेवर)

पुरस्कार –
१)अनेक सामाजिक संस्थाचे राज्यस्तरीय पुरस्कार तसेच बाळ शास्त्रीय जांभेकर पुरस्काराने विशेष सन्मानित.
२) माणगंगा साहित्य परिषदे कडून काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित.
३)राष्ट्रिय बहुजन संघा कडून साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित.
४)स्वदेशी भारत या संस्थेकडून स्वदेशी भारत पुरस्काराने सन्मानित.
५) बार्टी संस्थेकडून विशेष पुरस्काराने सन्मानित

विशेष सहभाग –
१) कवी आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे १०० हुन अधिक प्रयोग.
२) अनेक कवी संमेलनाचे अध्यक्ष पद म्हणून सहभाग
३) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिवार साहित्य संमेलनाचे निमंत्रित कवी म्हणून अनेक वेळा बहुमान
३) आमची माती आमची माणसं आमचं शिवार पुणे आयोजित साहीत्य समेंलनासाठी कवी संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड
४) महाराष्ट्रातील पहिल्या युवा स्पंदन साहित्य संमेलनाच्या संमेनलन अध्यक्षपदी निवड
५) ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमंत्रित कवी म्हणून निवड.
६) संविधान साहित्य संमेलन२०२१ च्या कवी समेंलनासाठी अध्यक्ष पदी निवड.
६) मागील सलग पाच वर्षा पासून पत्रकार संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी बिनविरोध निवड.

विशेष योगदान – युवा कवी अविनाश चव्हाण यांचा वाढदिवस हा दरवर्षी आश्रम शाळेत साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने एकदिवसीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते आणि त्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख कवी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवि अविनाश चव्हाण यांचा जन्म दिवस साजरा करतात .

अतिशय नामवंत व गाजेलल व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला लाभलेल आहे. त्यांच्या बऱ्याच कविता शिवाजी महाराजांवर प्रसिद्ध आहेत म्हणून “मी त्यांना “शिवदास ” ही म्हणते परंतु या अष्टपैलु हिऱ्यास अधिक आखिव रेखीव घडवले त्या महाराष्ट्राच्या मातीने महाराष्ट्राच्या रसिक वर्गाने त्यांना -हदयात बसवुन “युवा ” कवि अविनाश चव्हाण अशी उपाधी देण्यात आली.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे ” युवा ” हा शब्द खूप खूप लाखाचा आहे मणुष्य आहे जन्माला आला तो मरणा रच परंतु या जन्म मृत्यु च्या फेऱ्यात अमर राहते ते नाव पुस्तकाच्या पानावर कोरल्या सारखे ते -हदयाच्या कोऱ्यात कायम असे कोरले जाते असे लिहिले जाते कि कधीच न पुसले जाणारे नाव म्हणजे युवा हे या नावातच कळुन चुकते. अजुन एक सांगावे वाटते की , कृष्ण भगवान यांना बऱ्याच नावाने आपण ओळखतो त्यात एक नाव आहे जे की
” किशोर ” जो म्हतारपणी ही तरुण राहणार आहे हो ना! म्हणजे काय कि आपल आयुष्य आपल्या नावा वर किती खुलून बसते ओ ! तसेच लाडके युवा कवि अविनाशजी चव्हाण हे रसिक श्रोत्यांवर आपल्या युवा कवितांवर प्रभाव पाडत गाजले.

एखादया कविचे नाव व्यासपिठावर घ्यावे व नाव घेताच रसिकांनी टाळ्यांचा गडगडाट करावा हे एका कविसाठी खूप मोठी दाद असते. असे कवि अविनाशजी चव्हाण नेहमी म्हणतात. परंतु ही थाप ही दाद का व केव्हा मिळते जेव्हा कवि रसिकांच्या -हदयास स्पर्शतो सहज आपली जागा रसिकांच्या मनात करतो ही कला कविलाच कलाकारालाच जमते. कवि अविनाश नेहमी म्हणतात की ,काळीज फाटले की कविता जन्माला येते. हो तेही खरच आहे . मला वाटते की रसिकांच्या काळजाला झालेली जखमेवर फुंकर घालते ती कविता सर सादर करतात . असो ज्याचा त्याचा कवितेवर विश्वास , भाव व पाहण्याचा दृष्टीकोन अगदी भिन्न असतो.

सरांशी माझी भेट व्हास्टअॅप वर असलेल्या एका कवि ग्रुपवर झाली त्या ग्रुपचे नाव “महाकवि कालिदास कविकट्टा” या ग्रुपवर मी गेल्या 2 ते वर्षा वापसुन सरांना वाचत होती. त्यांच्या कविता माझ्या मनाला वेड लावयच्या मी त्या प्रत्येक ओळी वारंवार वाचुन पुन्हा ऐकायची खूप मोठे गुढ त्या कवितेच्या प्रत्येक चरणात असायचे! जो शोधून ही उमजेना पण ओळी मनाला भावल्या म्हणुन तर त्यांना खूप जपायची . कारण मी ग्रुपमध्ये नवीनच नवोदित होती म्हणुन . पण इतक्या मोठ्या कविच्या ओळी मी पुन्हा माझ्या स्टेटस ला ठेवायची. आपल कस असत ना !जे आपल्याला पटले आवडले त्याला आपण आवडीने आनंदाने दुसऱ्यास दाखवतो अगदी तसच माझे झाले की सरांना न कळता मी त्यांच्या ओळी जपायची वाचायची! पण म्हणतात ना ज्यांच्या ओळखी ज्यांची मैत्री वासुदेव ठरवतो ते वेळात बरोबर येवून भेटतात . अगदी तसेच एके दिवशी मी ग्रुपवर सरांचे नाव (९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणुन आले ) असे पत्र ग्रुपवर त्यांनी शेअर केले मग काय मन गप्प बसायला मानेनाच म्हणुन मी त्यांना कॉल केला.

जवळ जवळ अर्धा तास सरांशी माझे बोलने झाले कारण माझी ही कविता निवडण्यात असल्या कारणाने सरांशी मी संमेलनाबाबत सहज विचारले त्यावर सर म्हटले ” मॅडम जी… तुमची कविता ही कविकटट्यावर असणार आहे तेथे गझलकट्टा, ग्रंथ दिंडी, मुलाखत असे बरेच पर्व होणार आहेत . त्यावर तुम्ही घाबरू नका मी ही तेथेच येणार आहे आदल्या दिवशी या तुम्ही मी सांगतो तुम्हाला भेटल्यावर . हा क्षण मी आयुष्यात न विसरणारा क्षण आहे . कारण माझे बोलणे साध्या सुध्या माणसा सोबत नाही तर महाराष्ट्राच्या लाडक्या युवा कविशी झाले होते. आनंद गगणात मावेना मग काय मी सरांचा मो. नं. पर्सनल सेव्ह केला आणि सरांना संमेलनात येई पर्यंत मॅसेज व फोन केला. पण मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी असे सहज लोक म्हणतात हे त्या दिवशी कळले की हे खोट आहे .
मी सरांना फोन केला संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी की , सर जी! मला तुम्हाला भेटायच आहे. एक क्षण विलंब न करता सर म्हणाले या की मी इथेच आहे पण संमेलन एवढे तेवढे नाही एक गाव वसेल ऐवढ्या जागेत होते अशा ठिकाणी शोधायच कस ?

त्यावर सर मला म्हटले मॅडम जी ! तुम्ही नका मला शोधा मी येतो तुमच्याकडे. अगदी सहज बोलून गेले. व मोठे लोक ते बघा ना ! एका छोट्याशा कवयित्री कल्पना साठी सर हॉल सोडून बाहेर आहे ते माझ्या कविकटट्यावर. मला जवळ जवळ पंधरा वीस मि. शोधत शोधत खरच मोठ्या लोकांच्या मोठ्या बाता नाही तर ते अगदी लहान लहान गोष्टी कडे लक्ष देतात . मला भेटले त्या दिवशी कवि अविनाशजी माझे (मार्गदर्शक) आमच्या गप्पा रंगल्या कवितेशी निगडीत पण माझे लक्ष कवितेच्या संदर्भात नाही तर त्या व्यक्तिच्या पाऊल खुणां वर होते. कुठलाही गर्व नाही मी म्हणजे काय हे तर ते दान करून बसले आहेत . आता जो आहे ना! तो फक्त या तुमच्या सारख्या रसिकांचाच . त्यांना भेटून आनंदाला उधान आले होते . काय प्रतिमा आहे. काय तेज आहे त्या शब्दांवर जे -हदयातुन सुप पाखडतो ना! अगदी तसेच बाहेर पडायचे टपोरे दाणे चांगले मनात ठेवन्या सारखे.

आम्ही नीरोप घेतला व घरी येण्यास निघालो त्या नंतर . खूप दिवसांनी सरांना मी कॉल केला ती भीतीच नव्हती की काही देणार नाहीत .
कारण म्हणतात ना!

“मांगो उसिसे जो दे खुशिसे ” आणि आम्ही कवि काय भाकारिच असतो की शब्दांचे , भावनांचे , प्रेमाचे दोन शब्द मिळाले कि , आमच्या -हदयाच्या कंग्या भरतात .

मी नमस्कार सर जी म्हटले तेवढयात सर म्हटले बोला ना मॅडम जी कुठपर्यंत पोहचले तुमचे लिखाण .
मला आश्चर्य वाटले ते म्हणजे मी संमेलनातून निरोप घेतला होता सरांचा
पण सर माझे लिखाण पोहचण्याची वाट पाहत होते. हे विसरलेच मी की ,
एका कविला कवितेचच वेड असत .
तेव्हा मी सरांना अजून जवळुन ओळखले की , हे म्हणतात ना तुझा वेडा तुझा वेडा हे खरच कवितेचे “प्रेमी ” कवितेला इश्वर म्हणतात ते मला नेहमी म्हणतात की , कविता स्पर्धेत म्हणण्याची नसते ओ ! मी पुजा करतो कवितेची. खरच वंदनीय आहेतच पण माझे मार्गदर्शक ही झालेत. मला म्हणुन दाखवाना तुमची एखादी कविता अस सर म्हणाले की कोणत्या संमेलनात आहेत नी कोणत्या नाही असा परमांनंद मनाला लाभायचा . येवढा मोठा कवि माझ्या तोडक्या मोडक्या कविता ऐकतोय हे माझे भाग्यच म्हणा. असे कवि वर मला जिवणाच्या वाटेवर परमेश्वरा सारखेच लाभलेत.

सरांच्या गाजलेल्या कविता
१) तुझा वेडा
2) गाव माझा वेदना
3) ती वाट दूर गेली
४ ) ” तू ” यापैकी ” तू ” ही कविता आतिशय जिवनाचा रहस्य मिटवणारी आहे.

” अंत तू आरंभ तू
जिवनाचा प्रारंभ तू
श्वर ही तू ज्वर ही तू
प्रेम तू ईश्वर ही तू ..

मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला माहित नसते की कोण आई वडील कोण नाते संबध कोण ईश्वर परंतु व्यक्ती जसा जसा मोठा होतो त्याचा भावानिक सामाजिक विकास होतो .तसा तसा व्यकती निर्मात्याच्या कल्पकतेकडे कलतो . परंतु इथे येवून प्रत्येक व्यक्ती थांबतो मनुष्य हे मानायलाच तयार नाही की , तू कर्धा धर्ता आहे तू सृष्टीस निर्माता आहे विज्ञानाच्या जोरावर त्याने प्रगती तर खूप केली आहे परंतु तो विज्ञान निर्माण करणाऱ्याला विसरला हे खर !
म्हणुन कविला दर्शवावे लागले की , ”

श्वर ही तू म्हणजे अंतरी होणारा आनंद सुख कोणत्या सुखाचा मी उच्चार करत आहे ते म्हणजे भगवंताशी एकरूप होवून मोहाच्या जाळ्यातुन सुटका करून घेणे . मग ती कशी तर ज्वर ” ही तू म्हणजे काय ?भौतिक सुखाचा संसाराचा ताप माणसाला काय कमी आहे ओ संसार भासाचे ओझे. असते पण माणसाला त्याला स्वतःचे ओझे समजुन श्रिमंती , पैसा शोधन्याच्या मागे धावून खर्च केला आहे. कविचे म्हणणे तेच की प्रेम करायचे कोणावर धावायचे ते कोणामागे? विश्वाचा मालक वाट पाह तोय की ‘ माझा दास येईल चुकला तरी चालेल पण मुकला ना माझ्या नामस्मरणात हेच तर मला हवे आहे .
तुम्हा आम्हा सगळ्यांना ज्ञात आहे की ‘ आपण जन्माला येतो तेव्हा हाताची मुठ घट्ट बांधली असते ती का बर !

खर सांगु भगवंत म्हणतो तू जन्मा येण्याआधी मला विणवायचा देवा सुटका कर माझी या कोठडी तून मग देव सांगत असेल सोडेल तुला एका अटीवर हे बघ तुझ्या हातात माझे नमस्मरण आहे ते तू सोडता कामा नये . भकतीचाच बाजार तुला करायचा आहे. पण माणसाचे उलटे असते . स्वार्थ संपला की तू कोण ?
मी कोण ? अशा प्रवृत्तीचा माणव आहे म्हणुन कविस सांगावेसे वाटले की अंत करणारा प्रभू आरंभ हा तुझ्या त आहे.

” सार तू निर्धार तू
जीवनाचा आधार तू
ध्यास तू अन श्वास त
प्रेम तू विश्वास तू ” ..

प्रत्येकाच जीवन जगण्याच ध्येय वेगवे गळे असते . प्रत्येकाला साधु संत होता येत नाही . संसार हा एक स्वार्थाचा बाजार आहे हे जर अर्जुनाला उमगले असते तर कदाचित महाभारत हे घडलेच नसते . जीवनाचा सार वासुदेवाला येवून सांगावा लागला जीवनाचे ध्येय गाठून दयावे लागले. पण केव्हा जेव्हा एक मार्गदर्शक भेटतो कुणाच्या तरी काही गोष्टी मनाच्या गाभाऱ्यात येवून घर करतात . एक प्रकाशाचा किरण नवीन मार्ग शोधून देतो. त्याचा प्रमाणे कवितेचे दुसरे चरण आपल्याला सार असार आपला निर्धार आपली भगवंताकडे होणारी वाटचाल ही दाखवते.

“ध्यास तू अन श्वास तू प्रेम तू विश्वास तू ”

देव आहे हा एक दृढ विश्वास माणसाच्या मनात आहे . तो निराकार निर्गुण आहे. त्याचा वास चराचरात आहे. उदा .आपला श्वासोच्छवास चालतो हे आपणास माहित आहे. परंतु दिवस भरात हे कार्य कसे काय चालते काही काळ नाही तर दिर्घकाळ
हे चालत नाही तर तो चालवून घेतो कसे काय तोची जाणे ! आपला जन्माला येण्याचा दिवस वेळ आपल्याला माहित असतो परंतु जाण्याचा दिवस हा तोच ठरववितो याला म्हणतात विश्वास . पण हा प्रत्येकाचा नसतो हे मात्र खर !
माणसाचा माणुसकीतला देव हरवला आहे. जसे “शोधिसी माणवा, राऊळी मंदिरी, नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ” अगदी तंतोतंत जुळणाऱ्या या ओवी
कवि अविनाश यांच्या कवितेच्या चरणाशी जुळतात .

” मिलन तू अन विरह तू
जीवनाचा प्रहर तू
भास तू आभास तू
प्रेम माझे आस तू ..

कविच्या मधुर वाणीत मिलन म्हटले तर खरच गभवत प्राप्ती ईश्वराशी भेट ही कोणत्या न् कोणत्या रुपात होते हा
आपला दृढ विश्वास मनाशी घट्ट बसला कि आपल्याला कोणाचा विरह ही बोचत नाही . परंतु विश्वास हा अंधाऱ्या कोठडी सारखा असतो ज्यात आपले मत हा एकमेव दिवा किंवा प्रकाशकिरण असते. ज्याच्या मिलनाने व्यक्तिला जीवनाचा आनंद नश्वर किंवा जे आहे आपल्या जवळ ते आपले नाही असा उमगल्या वाचून राहत नाही . आजूबाजूला असलेले वातावरण व त्याचा बहुमोल प्रभाव माणसाच्या जडणघडणेत होतो. संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर , समर्थ रामदास स्वामी यांना ही तो राम कुठे ना कुठे स्वतःहात वास्तव्य करत आहे.
असे जेव्हा उमगले तेव्हाच त्यांनी लोकांना उपदेश देण्यास सुरुवात केली की , ” प्रभाते मनी
राम चिंतीत जावा
पुढे वैखरी
राम आधी वदावा
प्रेम देवावर केल्या वाचून त्याच्या मिलनाची उत्कठ आस मनास लागत नाही जसे मीराने प्रेम अर्पिले परमे श्वरास तशीच आस मिलनाची ही प्रखर होती. परमेश्वर प्राप्ती अर्जुनाला झाली असे नाही ती कौरवांना ही भेटली होती देव त्यांच्या ही घरी जात होते परंतु ओळखताच आला नाही हे त्यांचे कर्म म्हणुन कवी म्हणतात
भास तू आभास तू
ज्या जागी मी त्याच जागी तुझे अस्तित्व ही आहे हे मान्य करने होय .
” सार्थ तू अन अर्थ तू
प्रेम तू परमार्थ तू
भाग्य तू अन राग्य तू
प्रेम तू अन वैराग्य तू ”

प्रत्येक व्यक्तिच्या जिवनाचा उद्देश नेमका काय आहे हे त्या ईश्वरालाच ठाव असते. आपण केलेले मागच्या जन्मीचे कर्म आपल्याला पुढच्या जन्मी ओढते असे म्हणतात माणवी देह ‘ जन्म हा लगेच न भेटता चोर्यांशी लक्ष जीवयोणी तून हा प्रवास असतो मग आपले कर्म काय हे देवाला सार्थ केल्या वाचून कसे कळणार ! देवाला सार्थ केले जीवन आपले तरच त्याचा अर्थ आपणास कळणार आहे जीवनाचे गुढ उलगडणार आहे. तेव्हा कुठे मणुष्य संसाराच्या गाड्यातून मनुष्य अलगत तरतो तो म्हणजे परमार्थ च्या मार्गावरुन . “कुठे तरी हे माझे ते माझे आणि भ्रांतीचे ओझे ”
त्या माणवाला कळते म्हणुनच का मीरा महल सोडून मंदिरात जायची
कबीराने संसार टाकून देवाशी सलगी केली असावी. नव्हे नव्हे तुकारामांनी
सावकारकीच्या नोंदवह्या इंद्रायणीत बुडवल्या असतील.

“भाग्य तू अन् राग्य तू
प्रेम तू अन् वैराग्य तू . ”
किती सोप आहे जे मिळाल किंवा जे ताटात आहे तेच माझ नशिब हे फकत परमार्थीक शिकवण शिकवते. आहे त्यात समाधानी उगाच नश्वर न मागत बसणे. शाश्वत जे नाशिवंत नाही असे राग्य देवाकडून मागुन घेतले . तर तो आणि जिव आत्मा एकच होय .
प्रेमाने बांधलेली दोरी देवाशी आपोआप वैराग्यच्या वाटेवर येते सहजच आहे जिथे परमेश्वर भेटला तीथे कसले जीवन मृत्यु कोण्या चरणी झिझविला हा माणवाचा नर देह .
परमेश्वर साक्षात आहे शाश्वत आाहे हेच या कवितेतून उत्कट होते.
शेवटी एकच म्हणेन .

” वेगळे काय आहोत आपण
एक आत्मा एक शरीर
तुझ्या प्रेमात झाली देवा
राधा मीरा कबीर ”

अतिशय सुंदर रचना प्रगल्भ विचार सरणी मांडणारी देव आणि माणव यांची रेशीमदोरी न दिसणारी पण घट्ट विण असणारी ही कविता आहे. मला परीक्षण करायला संधी दिली म्हणुन मनस्वी आभार कविवर्य

नाव – कल्पना देवरे (धुळे)
मो . नं.9096356540


Back to top button
Don`t copy text!