दैनिक स्थैर्य । दि. १७ मे २०२२ । फलटण । ‘मिलीनीयर’ म्हणून ओळख असणा-या ‘प्रशांत नाकती’च्या मराठी गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलयं. त्याने लिहीलेली, गायलेली सर्व गाणी अवघ्या काही तासातच हीट होतात. सोशल मिडीयावर त्याच्या गाण्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. नुकतंच ‘नादखुळा म्युझिक’ रेकॉर्ड लेबल प्रस्तुत, निखिल नमित आणि प्रशांत नाकती निर्मित ‘कपल लयभारी’ गाणं रीलीज झालं आहे. अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल होत आहे.
याआधी प्रशांतची ‘पोरी तुझ्या नादानं, माझी बायगो, लाजरान साजरा मुखडा, मी नादखुळा, आपली यारी, आपलीच हवा अशी एकाहून एक भन्नाट गाणी व्हायरल झाली. या गाण्यात प्रशांतने एक सोज्वळ गावरान लव्हस्टोरीचं चित्रण दाखवलं आहे. त्यामुळे ही वेगळी लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कपल लयभारी या गाण्याचे गीतकार प्रशांत नाकती आहे. या गाण्याचं संगीत प्रशांत नाकती, संकेत माने आणि कुणाल-करण यांनी केलं आहे. तर गायक ‘ऋषभ साठे’ आणि गायिका ‘सोनाली सोनावणे’ हीने हे गाणं गाऊन या गाण्याला चार चांद लावले आहेत. या गाण्यात अभिनेता विजय सोनावणे आणि अभिनेत्री हिंदवी पाटील हे प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या सोशल मिडीयावर सर्वत्र ‘कपल लयभारी’ गाण्याच्या रील्स व्हिडिओची चर्चा आहे.
‘कपल लयभारी’ या लव्ह सॉंगविषयी प्रशांत नाकती सांगतो, “‘आपलीच हवा’ या गाण्याच्या घवघवीत यशानंतर आम्ही एक गावरान लव्हस्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एका गावातली मुलगी जी एका घरात मोलकरीण म्हणून काम करत असते आणि त्याच घरातला एक मुलगा जो परदेशी शिक्षणासाठी गेलेला असतो. तो आल्यानंतर त्याला लहानपणीच्या आठवणी काही आठवत नसतात. ती त्याला लहानपणीच्या आठवणींची जाणीव करून देते. असं हे प्रेमाचं संदेश देणारं गाणं आहे.”
पुढे तो सांगतो, “मी आणि संकेतने पहिल्यांदाच संगितकार कुणाल करणसोबत म्युझिकवर एकत्र काम केलं. अभिनेता विजय सोनावणे आणि अभिनेत्री हिंदवी पाटील ही जोडी या गाण्यादरम्यान पहिल्यांदाच नादखुळा म्युझिक रेकॉर्ड लेबल सोबत एकत्र काम करत आहे.”
नाशिकमधील चित्रीकरणाविषयी गोड किस्सा सांगताना प्रशांत म्हणतो, “या गाण्याचं चित्रीकरण हे नाशिकमध्ये झालं. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी एक गोड किस्सा घडला. तिथे आऊट डोअर शुटिंग करताना बाजूच्या रस्त्याने एक शाळेची व्हॅन गेली. मुलांना कळलं की इथे शुटींग सुरू आहे. त्यानंतर ते शाळा सुटल्यानंतर पुन्हा त्याच रस्त्याने त्यांची बस जाणार होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बसचालकाला सांगून शुटींग पाहण्यासाठी १० मिनीटं बस थांबवली आणि त्यानंतर त्यांनी प्रशांत नाकती, सोनाली सोनावणे, नीक शिंदे, विजय सोनावणे आणि हिंदवी पाटीलसोबत फोटो काढले. मोबाईलच्या जमान्यात त्या छोट्या मुलामुलींने त्यांच्या वहीवर सगळ्यांच्या सह्या देखिल घेतल्या. त्या सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण साजरे करताना मजा आली.”
Link – https://naadkhulamusic.openinapp.co/couple-laybhari–vijay-sonawane–hindavi-patil–sonali-sonawane–rishabh-sathe–prashant-nakti