
स्थैर्य, फलटण, दि. 25 ऑगस्ट : आपल्या सामाजिक कार्यामुळे आणि अभिनयामुळे देशभरात ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी नुकतीच फलटण येथील ऐतिहासिक मुधोजी मनमोहन राजवाड्याला सदिच्छा भेट दिली. यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे राजवाड्यात स्वागत केले.
अभिनेते सोनू सूद यांनी मुधोजी स्कूललाही भेट दिली. यावेळी त्यांनी ऐतिहासिक वास्तूची पाहणी केली आणि फलटणच्या समृद्ध इतिहासाची माहिती घेतली. सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत करतानाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित झाला असून, फलटणकरांमध्ये त्यांच्या या भेटीची मोठी चर्चा सुरू आहे.
सोनू सूद यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. फलटणच्या ऐतिहासिक वैभवाने ते प्रभावित झाल्याचे दिसून आले.