पोलीस भरतीसाठी जोडला धरणग्रस्त असल्याचा बनावट दाखला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २१ मे २०२३ | सातारा |
सातारा पोलीस भरतीत आपल्या अर्जासोबत धरणग्रस्त असल्याचा बनावट दाखला जोडून लाभ घेतल्याप्रकरणी एका तरुणासह अन्य एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी विनोद गोरक्षनाथ मोरे (वय २७, रा. मोरेवाडी-बांबोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) व अन्य एकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलीस भरतीतील ही घटना दि. ९ नोव्हेंबर २०२२ ते दि. १५ डिसेंबर २०२२ या कालावधीत घडली आहे. विनोद मोरे याने बनावट धरणग्रस्त असल्याचा दाखला कोठे तयार केला, या प्रकरणात त्याच्यासोबत आणखी कोण कोण आहे, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे अधिक तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!