
स्थैर्य, 10 जानेवारी, सातारा : हुतात्म्यांची नगरी असणार्या खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये आज शेतीसाठी वापरण्यात येणार्या बनावट खते व कीटकनाशक जप्त करण्यात कृषी विभाग व पोलिसांना यश आले आहे. सुमारे 30 लाख रूपयाचा बनावट साठा जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट साठा सापडल्याची प्रथमच घटना खटव तालुक्यात घडली आहे. अनेक शेतकर्यांची फसवणूक झाल्याची बाब पुढे आली आहे.
याबाबत माहिती अशी की, वडूज नगरीमध्ये बनावट खत व कीटकनाशक तयार करून ते शेतकर्याच्या बांधावर पोहोचवण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी सातारा जिल्हास्तरीय भरारी पथक कृषी विकास अधिकारी श्री गजानन ननवरे जिल्हा गुणवंत नियंत्रक निरीक्षक संजय फडतरे, कृषी अधिकारी के. के. राऊत, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे रोहित फराने
यांनी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री फरांदे पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वडूज येथील बनावट खत व कीटकनाशकावर धाड टाकली.वडूज ता. खटाव येथील प्रतीक काळे यांचे राहते घरासमोरुन पोलिसांनी गोदामा मध्ये बनावट रासायनिक खते कीटकनाशक यांचा साठा सापडला.अनुदानित रासायनिक खतांचे पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड या कंपनीचे डीएपी (18:46) या खताच्या 90 भरलेल्या गोण्या तसेच नाव नसलेल्या सुमारे 390 कच्चामाल डीएपी खत म्हणून वापरणेच्या उद्देशाने तेथे आढळून आले तसेच रासायनिक खत म्युरेट ऑफ पोटॅश याच्या सुद्धा 15 गोण्या आढळून आल्या.
रासायनिक खत बोरिक अॅसिड नॅशनल अॅग्रो हायटेक या कंपनीच्या नावे सुमारे । मेट्रिक टन कीटकनाशक क्लोरोपायरीफॉस 10 टक्के दाणेदार कीटकनाशक सुमारे 2.7 मॅट्रिक टन तणनाशक ग्लाय फॉसेट 41 टक्के एस एल या तणनाशकाचे सुमारे एक लिटर पॅकिंग मधील 340 बाटल्या संशयित तननाशक ग्लायफॉसेट 200 लिटर बॅरल मध्ये आढळून आले. याचा वापर एक लिटर पॅकिंग मध्ये करण्यासाठी येणार होता. उंदीर नाशक झिंक फॉस्फेट सुमारे 12 किलो 10 ग्रॅम पॅकेटमध्ये तसेच संशयित कीटकनाशक अल्युमिनियम फॉस्फाईड 10 ग्रॅम पॅकेटमध्ये सुमारे 20 किलो आढळून आले. त्याचबरोबर पॅरादीप फॉस्फेट लिमिटेड तथा जय किसान कंपनीच्या 18 : 46 व 10:26.26 या खताच्या नवीन छपाई केलेल्या सुमारे 1580 रिकाम्या गोण्या इंडियन पोटॅश लिमिटेड या कंपनीच्या म्युरेट ऑफ पोटॅश या खताच्या सुमारे 250 रिकाम्या गोण्या आणि इफको को-
ऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीच्या 18 46 या खताच्या सुमारे 200 नवीन छपाई केलेल्या रिकाम्या गोण्या आढळून आल्या असा एकूण एकंदर सुमारे 25.50लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

