दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । मुंबई । राज्यात राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर राजकीय भूकंप येणार असे सुतोवाच या निवडणुकींपूर्वीच केले होते.आता शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अशात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या समर्थनाने अथवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या समर्थनावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस सरकार स्थापनेचा दावा करतील, असा भाकित इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बुधवारी वर्तवले आहे. शिवसेना विधानसभा बर्खास्त करण्याच्या दिशेने प्रयत्नरत असल्याचे खासदार संजय राउत यांच्या ट्विट वरून समोर आले आहे.पंरतु, तुर्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यापर्यायाच्या दिशेने चाचपणी करण्याची शक्यता कमी आहे.
विधानसभा बर्खास्त झाली तर राज्यावर मध्यावधी निवडणुका लादल्या जाण्याची शक्यता आहे.अशात केंद्र सरकारकडून हालचालींना वेग येवून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होण्याची शक्यता आहे.राज्यपालांना कोरोनाची लागण झाली असली तरी ते राज्यातील घडमोडींच्या अनुषंगाने कार्यरत आहेत. राजकीय स्थिती लक्षात घेता देवेंद्र फडणवीस यांना ते सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करू शकता,अथवा विश्वास मताचा ठराव आणून ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देवू शकतात.
कुठल्याही स्थिती ही भाजपला सत्तेवर आणण्यासाठी अनुकुल आहे, असे पुढे बोलतांना हेमंत पाटील म्हणाले. भाजपने सर्व बाजून शिवसेनेला ‘चेक मेट’ केले असले तरी पक्षाच्या नेत्यांकडून कमालीचे मौन बाळगले जात आहे. दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडून सर्वच पर्यायांसंबंधी विचारविमर्श केले जात आहे. अशा भाजपच्या भुमिकेमुळे शिवसेनेच्या बंडखोरांना बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले. पंरतु, या राजकीय ‘बुद्धीबळात’ सर्वसामान्य मतदार मात्र त्यांच्या मतांचा कशाप्रकारे खेळखंडोबा केला जात आहे, याची प्रचिती घेत आहेत असे पाटील म्हणाले.