फडणवीसांनी राजभवनातच खोली घेऊन राहावे – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 20 : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात राज्यपालांकडे सतत तक्रारी करत आहेत. मलबार हिलवरच्या बंगल्यातून राजभवनात तक्रारी करण्यासाठी सतत येणं फारच लांब पडतयं आणि यामध्ये त्यांचा फारच वेळ जातोय. त्यापेक्षा त्यांनी राजभवनातच एखादी खोली घेऊन राहावं, असा उपरोधिक सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री. फडणवीस यांना दिला आहे.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून ठाकरे सरकारवर कोरोनाच्या कार्यात अपयशी ठरल्याची सातत्याने टीका केली जात आहे. महाराष्ट्र बचावसाठी 22 मे रोजी भाजपने राज्यव्यापी आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत मंत्री मुश्रीफ यांनी बुधवारी भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि सुब्रमण्यम स्वामी यांचा खरपूस समाचार घेतला.

मुश्रीफ म्हणाले, राज्यात कोरोना रोखण्यास ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी अपयशी ठरल्याच्या वल्गना विरोधक करीत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी केलेल्या कामाबद्दल जनतेत सहानुभूती आहे. या उलट देशात कोरोना संसर्ग रोखण्यात अपयश आल्याबद्दल केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार सर्वात आधी बरखास्त केलं पाहिजे.

देशासह राज्यात कोरोना संसर्ग वाढतच असताना सर्वांनी एक होऊन कोरोनाशी लढणं अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत भाजपचे नेते मात्र राजकारण करण्यात गुंतले आहेत. महाविकास आघाडी सरकारने राजीनामा द्यावा असं म्हणणाया सुब्रमण्यम स्वामी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी अमेरिकेचे अध्यक्ष केलं पाहिजे, आता जोरदार टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.

घाणेरडय़ा राजकारणाचा जनतेने निषेध करावामंत्री मुश्रीफ म्हणाले, गेल्या तीन महिन्यांपासून म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या दिवसापासून भाजप राजकारण करीत आहे. राज्य आणि देशावर कोरोना संसर्गाचे एवढे मोठे संकट आले असतानाही भाजप ज्या पद्धतीनं घाणेरडे राजकारण करीत आहे, त्यांचा सामान्य जनतेनेही निषेधच केला पाहिजे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!