दैनिक स्थैर्य । दि. ०४ एप्रिल २०२३ । ठाणे । ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जनतेशी प्रामाणिक राहून गृहमंत्री फडणवीस यांनी तातडीनं राजीनामा द्यायला हवा. महिलांचा सन्मान हे काही नुसतं बोलून होत नाही. उगाच फुकाच्या यात्रा काढू नका. तुमच्यात जर आरोपींवर कारवाई करण्याची हिंमत नसेल तर राजीनामा द्या, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्यातील रुग्णालयात दाखल असलेल्या रोशनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. रोशनी ठाकरे यांची विचारपूस केल्यानंतर उद्धव ठाकरे थेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे गेले. पण आयुक्तालयात पोलीस आयुक्तच उपस्थित नव्हते. त्यामुळे भेट होऊ शकली नाही. उद्धव ठाकरेंनी ठाण्याच्या विश्रामगृहात या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)