उदयनराजेंकडून फडणवीसांना भवानी तलवारीची प्रतिकृती भेट


दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२३ | सातारा |
राष्ट्रवादीचे आमदार अजितदादा पवार यांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप करून उपमुख्यमंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. त्यांच्यासोबत यावेळी ९ आमदारांनीही शपथ घेतली. अजितदादांच्या शिंदे-भाजपाच्या सरकारमध्ये सामील होण्यामागे ना. देवेंद्र फडणवीस यांची चाणक्यनीती असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या देवेंद्र फडणवीस यांचे भाजपामधील राजकीय वजन खूपच वाढल्याचे दिसत आहे. दरम्यान, अजितदादांच्या या कृतीमुळे सध्याचे राज्यातील राजकारण पूर्णपणे तापले असताना भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भवानी तलवारीच्या प्रतिकृती त्यांना भेट दिली.

खा. उदयनराजे यांनी ना. फडणवीस यांना भवानी तलवार भेट दिल्यामुळे यामागचे कारण काय? असा प्रश्न सध्या बर्‍याच जणांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे ना. देवेंद्र फडणवीस यांचे राजकारणातील वजन एकदमच खूप वाढल्याचे दिसत असून त्यांना दिल्लीच्या राजकारणात मोठे पद मिळणार असल्याचे हे संकेत तर नाहीत ना? अशीही चर्चा सध्या राज्यात सुरू झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!