दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२२ । बारामती । पोलीस ,सैनिक , M P S C , P S I , S T I , तलाठी भरतीपुर्व प्रशिक्षण केन्द्रातील मुलांना स्पर्धा परीक्षेच्या पुर्वतयारीसाठी ऊपयोगी पुस्तके व स्टेशनरी चे देवगिरी बुक सेंटर चे ऊद्घघाटण मा.सतीश मामा खोमणे ,मा. अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद व संभाजी नाना होळकर, अध्यक्ष, बारामती तालुका राष्ट्रवादी काँ. पक्ष यांच्या प्रमुख ऊपस्थित नुकतेच झाले तुकाराम पवार, अध्यक्ष कै. लक्ष्मीबाई पवार एज्युकेशन फाऊंडेशन संचलित फिनिक्स इंग्लिश मेडियम स्कूल व देवगिरी करिअर अकँडमी व देवगिरी बुक सेंटर हे आपल्या प्रस्तावीक भाषणात म्हणाले की बारामती शहर व परिसरात ५० पेक्षा जादा करिअर अकँडमीतील विद्यार्थ्यांना पुस्तकासाठी पुण्याला जावे लागते व येथे सर्व पुस्तके वाजवी दरात मीळत नाहीत म्हणून आम्ही ना नफा ना त़ोटा या आधारे देवगिरी बुक सेंटर सुरू करीत आहोत. या प्रसंगी मा. सतीशमामा खोमणे हे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की पोलीस व सैन्य भरतीसाठी शारीरिक चाचणी बरोबर लेखी परिक्षा ही तेवढीच महत्त्वाची आहे यासाठी देवगिरी बुक सेंटर चा फायदा बारामती शहर व तालुक्यात येनार्या मुलांना होईल. तसेच संभाजी नाना आपल्या भाषणात म्हणाले की बारामती हे स्पर्धा परिक्षेचे माहेरघर आहे व स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी या देवगिरी बुक सेंटर चा फायदा होईल.
देवगिरी करीअर अकँडमीचे संचालक श्री चोपडेसर , यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करीत करीत मुलांना अनेक कीस्से सांगितले व आभार प्रदर्शन केले. यावेळी फिनिक्स इंग्लिश मेडियम स्कूल व देवगिरी करिअर अकँडमीचे संचालक , श्री. ओंकार पवार , डॉ. स्नेहल पवार , डॉ. रूपाली भगत , आप्पा , सारीका ओगले मँडम ,अँड. संतोष चोपडे , झगडे सर ,वाघमारे सर ,काशिद सर , सर्व विद्यार्थी व परीसरातील नागरिक ऊपस्थित होते.