दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा यांच्या अधिनस्त कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम पुर्ण करीत असलेल्या विद्यार्थ्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य सामायिक प्रवेश परिक्षा महाराष्ट्र शासन यांचे वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शासकीय वसतिगृहातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहू नयेत व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, दिनांक 9 नोव्हेंबर 2022 अखेर वसतिगृह प्रवेश अर्ज भरावयाचा कालावधी मुदत वाढविणेत आलेली आहे.
तरी जिल्हयातील मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिनी ऑफलाईन (मॅन्युली) प्रवेश अर्ज दिनांक 9 नोव्हेंबर 2022 अखेर विनामूल्य वाटप सुरू राहाणार आहे. तरी जास्तीत जास्त मागावर्गीय विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रवेश अर्ज करावेत, असेही आवाहन श्री. उबाळे यांनी केले आहे.