दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२३ | फलटण |
गुंफण अकादमीच्या वतीने घेण्यात येणार्या माजी खासदार प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेसाठी राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे या स्पर्धेला विनोदी कथा पाठविण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. स्पर्धकांनी १५ ऑगस्टपर्यंत आपल्या कथा पाठवाव्यात, असे आवाहन अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी केले आहे.
मराठी साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्या या कथा स्पर्धेचेे हे २१ वे वर्ष आहे. विनोदी साहित्य व विनोदी लेखन करणारे लेखक यांच्या बाबतीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या आणि नवोदित विनोदी लेखकांना प्रोत्साहन व व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने गुंफण अकादमीतर्फे ही स्पर्धा घेतली जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून या स्पर्धेला प्रतिसाद मिळत असतो.
स्पर्धेसाठी पाठवावयाची विनोदी कथा सुटसुटीत असावी. दीर्घकथा नसावी. स्पर्धेसाठी आलेल्या कथांचे तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. विजेत्या कथालेखकांना रोख पारितोषिके व प्रशस्तीपत्र देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात येईल. लेखकांनी आपली स्वरचित विनोदी कथा कागदाच्या एका बाजूस सुवाच्च अक्षरात लिहून अथवा टाईप करून दि. १५ ऑगस्टपर्यंत पोहोचेल, अशी पाठवावी.
अधिक माहितीसाठी ८०८०३३५२८९ व ९८५०६५९७०८ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.
स्पर्धेसाठी कथा पाठविण्याचा पत्ता – डॉ. बसवेश्वर चेणगे, अध्यक्ष, गुंफण अकादमी, मसूर, ता. कराड, जि. सातारा – ४१५१०६
किंवा
विकास धुळेकर, एफ १७, गार्डन सिटी, राधिका रोड, सातारा – ४१५००२.