दैनिक स्थैर्य । दि.१४ जानेवारी २०२२ । सातारा । शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी शिष्यवृत्ती, शिक्षण फी परिक्षा फी या योजनेचे अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील अर्ज महाडीबीटी पोर्टलवर नुतनीकरण (Renewal) अर्ज व नवीन अर्ज नोंदणी दि. १४ डिसेंबर २०२१ पासून सुरूवात करण्यात आलेली आहे.
कोविड साथीमुळे काही महाविदयालये बंद आहेत.त्यामुळे काही विदयार्थ्यांना शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. विदयार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये म्हणून अद्याप शिष्यवृत्तीचे अर्ज न भरलेल्या विदयार्थ्यांसाठी शासनाने मुदत वाढ दिलेली आहे. अनु जाती प्रवर्गासाठी २२ जानेवारी पर्यंत तर विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी सातारा जिल्हयातील पात्र विदयार्थ्यांनी सन २०२१-२२ शिष्यवृत्तीचे अर्ज विहित मुदतीत ऑनलाईन सादर करावेत.
महाविद्यालयांनी अर्ज भरण्याची सुविधा महाविद्यालयातच उपलब्ध करून दयावी. तसेच जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी अर्ज भरण्याबाबत जनजागृती करावी. महाविद्यालय स्तरावरील सर्व पात्र अर्ज या कार्यालयाकडे वर्ग करावेत.असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, पुणे विभाग,पुणे बाळासाहेब सोळंकी, व सहायक आयुक्त समाज कल्याण ,सातारा नितिन उबाळे यांनी केले आहे.