स्थैर्य, सोलापूर, दि. 20 : केंद्र सरकारच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील 2020-21 शैक्षणिक सत्रासाठी तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी 17 जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते, अर्जाला आता 6 ऑगस्ट 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रम तीन वर्षाचा असून प्रथम सत्रासाठी राज्यातून बरगढसाठी (ओडिसा) 13 आणि वेंकटगिरीसाठी दोन जागेच्या प्रवाशासाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे. यासाठी नागपूर, सोलापूर, मुंबई आणि औरंगाबादच्या प्रादेशिक उपायुक्तांकडून 17 जुलै 2020 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविले होते. मात्र याला मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाची वेबसाईट www.dirtexmah.gov.in वर आणि सर्व प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातही उपलब्ध आहे.