दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । सातारा । सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारा मार्क्सवाद अतिशय सोप्या भाषेत समजून सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ विधीज्ञ कॉम्रेड धैर्यशील पाटील होय. सामान्यांमध्ये सामान्य आणि विचारवंतांमध्ये विचारवंत असे धैर्यशील पाटील होते अशा शब्दात अनेकांनी एडवोकेट धैर्यशील पाटील यांना सातारा येथे झालेल्या शोकसभेत अभिवादन केले. परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने सातारच्या श्री.छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये कामगार नेते व ज्येष्ठविधीज्ञ कॉम्रेड धैर्यशील पाटील यांना यांच्या निधनाबद्दल शोकसभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी विचार मंचावर कॉ विजय मांडके , कॉ त्र्यंबक ननावरे , सुरेश साधले , कॉ शिवाजी पवार , कॉ सतीश कांबळे आदी होते. यावेळी एडवोकेट धैर्यशील पाटील यांचे सुपुत्र एडवोकेट सिद्धार्थ पाटील व त्यांच्या सुनबाई एडवोकेट अनुपमा पाटील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांनी धैर्यशील पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीची उकल केली आणि समाजातल्या शेवटच्या थराचा माणसाचा विचार करणारा एक ज्येष्ठ नेता हरपल्याची भावना व्यक्त केली. रंगकर्मी व माध्यमकर्मी तुषार भद्रे यांनी भूमीशील्पच्या माध्यमातून धैर्यशील पाटील यांनी वैचारिक मांडणी केली आहे त्याचे पहिल्या स्मृतिदिनापर्यंत पुस्तक करणार असल्याचे सांगितले. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी भारतातला एक ज्येष्ठ विधीज्ञ परंतु जमिनीवर पाय असलेला असे एडवोकेट धैर्यशील पाटील यांचे वर्णन केले. यावेळी कॉ. किरण माने , सुरेश साधले , धैर्यशील कांबळे ,गौतम भोसले शौकत पठाण , एडवोकेट ताहेर मणेर , कॉ वसंतराव नलावडे , रवींद्र शिवदे , सुरेश महाजनी , प्रा डॉ धनंजय देवी , राजेंद्र शेलार ,कॉ श्याम चिंचणे , कॉ माणिक अवघडे , दीपक दीक्षित , चैतन्य दळवी यांची दादांना आदरांजली वाहणारी भाषणे झाली. शेवटी एडवोकेट धैर्यशील पाटील यांचे चिरंजीव एडवोकेट सिद्धार्थ पाटील यांनी सर्वांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सर्वांनी शेवटी एक मिनिट उभे राहून आदरांजली वाहिली यावेळी बाबुराव शिंदे प्राध्यापक दत्ताजीराव जाधव दिलीप भोसले प्रकाश खटावकर कॉम्रेड शंकर पाटील आदी उपस्थित होते.