
स्थैर्य, फलटण, दि. २० नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मध्ये ‘राजे गटा’कडून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मैदानात उतरलेले पांडुरंग गुंजवटे यांच्याबद्दल मतदारांमध्ये चांगलाच आशावाद दिसून येत आहे. जुने-जाणते आणि दांडगा अनुभव असलेले पांडुरंग गुंजवटे हे प्रभागातील नागरिकांसाठी एक उत्तम पर्याय आहेत, अशा भावना सध्या व्यक्त होताना दिसत आहेत. त्यांचे कामाचे कसब आणि प्रशासनावरील पकड लोकांना परिचित आहे.
पांडुरंग गुंजवटे यांची ओळख केवळ एका प्रभागातील कार्यकर्ते म्हणून नाही, तर आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर या तिन्ही दिग्गज नेत्यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून जनमानसात ओळखले जातात. ‘राजे गटा’ने गेली तब्बल ३० वर्षे फलटण शहरासाठी दिलेले भरीव योगदान, या नेतृत्वाची शहराला असलेली जाण आणि स्वतः गुंजवटे यांचे विविध विकासकामांमध्ये असलेले सक्रिय योगदान, या त्यांच्या सर्वात मोठ्या जमेच्या बाजू आहेत.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये प्रामुख्याने संत बापुदास नगर, हनुमान नगर, सातारा रस्ता दोन्ही बाजू, मुधोजी कॉलेज परिसर, जुने ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर आणि चक्रपाणी मंदिर परिसर या भागांचा समावेश होतो. या भागातील मतदारांशी पांडुरंग गुंजवटे यांनी गाठीभेटी सुरू केल्या असून, त्यांच्याकडे प्रभागाच्या विकासासाठी नेमकी कोणती योजना आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या अनुभवाच्या बळावर प्रभागातील जुने प्रश्न मार्गी लागतील, अशी मोठी आशा मतदारांमध्ये दिसून येत आहे.
एकंदरीत, प्रभाग ७ मधील लढत अत्यंत चुरशीची असली तरी, ‘राजे गटा’चा विश्वास आणि पांडुरंग गुंजवटे यांचा स्वतःचा अनुभव ही समीकरणे त्यांच्यासाठी अनुकूल ठरत आहेत. नागरिकांचा त्यांच्याप्रती असलेला आशावाद आणि ‘राजे गटा’चे मोठे योगदान लक्षात घेता, पांडुरंग गुंजवटे हे मलठण (प्रभाग ७) च्या निवडणुकीत बाजी मारून ‘राजे गटा’च्या विजयात महत्त्वाचे योगदान देतील, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

