दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । सातारा । एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्याने सातारा- जावली मतदारसंघाचा चौफेर विकास करताना प्रत्येक गावात ग्रामस्थांनी सुचवलेली विकासकामे करण्यासाठी प्राधान्य दिले. प्रत्येक गावात कोट्यवधीची विकासकामे झाली असून ग्रामस्थांना अपेक्षित असणारी विकासकामे मार्गी लावली याचे समाधान आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून महिगांव ता. जावली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोलीसाठी ९ लक्ष रूपये आणि महिगांव येथील मुख्य रस्त्यावरील साकव पुल बांधणेसाठी आमदार फंडातून ५ लक्ष रूपये निधी उपलब्ध झाला. या विकासकामांचे भूमिपूजन आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शांताराम पवार (नाना ), उपसरपंच हरीश्चंद्र पवार, सदस्या सौ. अनिता मोरे, सौ. गौरी मुसळे, सौ. नुतन जाधव, विकास सेवा सोसायटीचे अंकुश भोसले, तुकाराम पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित पवार, सदस्य सारीका भानसे, रेश्मा भानसे, माधुरी सणस, योगेश जाधव, सतोष जाधव आदी उपस्थित होते.
प्रत्येक गावातील मूलभूत प्रश्न सोडवताना गावाचा कायापालट करण्याला प्राधान्य दिले. प्रत्येक गावात विकासगंगा आणली असून आगामी काळात मतदारसंघातील प्रत्येक गाव विकासाच्या बाबतीत अग्रेसर असेल, असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमास उत्तम पवार, दिलीप पवार, गुलाबराव पवार, शिवाजी पवार, रामभाऊ चावरे, शामराव पवार, मोहन सणस, यशवंत भोसले, ज्ञानेश्वर मोरे, अशोक पवार, सचिन मोरे ,गणेश जाधव, लखन कदम, महेश भोसले, सोमनाथ सावंत, संदीप जाधव, गणेश पवार, समाधान पवार, हेमंत पवार, शाम सणस, संतोष जाधव, संतोष जगदाळे, मयूर भोसले, मिथून पवार, सतिश भानसे, किरण भानसे, सुरेश चव्हाण, दत्ता पवार, मानसिंग खरात, अशोक खरात आणि ग्रामस्थ उपस्थित होते.