
दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । मुंबई । विद्यार्थ्यांना कोडिंग कौशल्ये आणि डिझाइनमध्ये (यूआययूएक्स) प्राविण्य मिळवण्यास मदत करणाऱ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लर्निंग हब (आयटीएलएच) या झपाट्याने विस्तारणाऱा इनक्यूबेटर आपल्या नवी मुंबईतील मुख्यालयासाठी २०२२ या वर्षात (आर्थिक वर्ष २०२२) १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सज्ज झाला आहे. सध्याच्या कर्मचारी संख्या बळाच्या आकाराच तुलनेत या वर्षाच्या अखेरीस त्यात १० पट वाढ होण्याची अपेक्षा आहे.
उद्योगात प्रवीण व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी टेक स्किल अपग्रेडेशन सेंटर आधीच ४० कर्माचा-यांच्या मजबूत आणि गतिमान टीमसह कार्यरत आहे आणि नवीन भरतीमुळे विक्री, विपणन, गुणवत्ता विश्लेषण. शिक्षण अनुभव, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक आणि मानव संसाधन यासह संस्थेच्या ६ मुख्य वर्टिकलला बळ मिळेल. त्यांच्या भविष्यातील विस्तार योजनांचा एक भाग म्हणून, कंपनीने आपला प्रादेशिक पोहोच टियर-१ शहरांपर्यंत विस्तारित करण्याचा आणि अबू धाबी, कतार आणि दुबई सारख्या जागतिक शहरांमधून अधिक नोंदणी स्वीकारून मध्यपूर्वेमध्ये त्यांचे लक्ष केंद्रित करण्याचा मानस असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. औद्योगिक समज निर्माण करण्यासाठी, कंपनीने आठवड्याच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यरत व्यावसायिकांची नियुक्ती केली आहे.
आयटीएलएचचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अॅलेक्स जॉर्ज म्हणाले, “शिकणे पुनर्परिभाषित करणे हे कंपनी म्हणून नेहमीच आमचे अंतिम ध्येय राहिले आहे. प्राविण्य, व्यावसायिकता आणि व्यावहारिकता हे उद्योगाचे तीन स्तंभ आहे. जे तंत्रज्ञान श्रेणीतील उमेदवाराची रोजगारक्षमता निर्धारित करतात. आमच्या अनोख्या अनुभवात्मक शिक्षण पद्धतीने एक अग्रगण्य अध्यापनशास्त्र तयार केले आहे जे व्यावहारिकदृष्ट्या कौशल्य आणि क्षमतांचे उद्योग अनुकरण आहे. भारत आणि मध्य पूर्वेतील अनेक विद्यार्थ्यांनी करिअर आधार म्हणून आयटीएलएचवर विश्वास ठेवला आहे. या आत्मविश्वासामुळे आम्हाला एक संघ आणि एक कंपनी म्हणून काही विस्तार योजना स्थापन करण्यास सक्षम केले आहे. आम्ही अधिक अभ्यासक्रम जोडण्याचा, महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट आणि मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणासाठी अधिक मार्ग खुले करण्याचा, कॉर्पोरेट प्रशिक्षणासह व्यावसायिकांना प्रवेश देण्याचा विचार करत आहोत. आयटीएलएचच्या निष्णात टीमसोबत आपल्या करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी एक शानदार संधी वाट पाहत आहे.”
सुरुवातीपासूनच, यूआय आणि यूएक्ससाठी डिझाइन कोर्समध्ये अनुभवात्मक शिक्षण देणारे टेक इनक्यूबेटर वाढीसाठी सज्ज झाले आहे. कंपनीने आताच्या तिमाहीत ६०% लक्षणीय सांघिक वृध्दिची नोंद केली आहे.आणि चालू दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस सांघिक वृध्दीचे प्रमाण ८० पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सेल्स, मार्केटिंग, क्वालिटी अॅनालिसिस, लर्निंग एक्सपिरियन्स विंग, ट्रेनर आणि मेंटर्स आणि ह्युमन रिसोर्सेस यासारख्या कंपनीमध्ये भरतीसाठीच्या खुल्या जागा ह्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी असतील.