दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । मुंबई । आगामी सणांचा कालावधी आणि जेएनपीटीमधील वाहतुकीची कोंडी यांच्यामुळे इंटरसिटी ट्रक्सची मागणी वाढू लागल्यामुळे राहो या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या डिजिटल फ्रेट नेटवर्कने पुणे आणि गांधीधाम येथील आपल्या विद्यमान कार्यालयांसह पश्चिमेतील भिवंडी येथे आपले ऑपरेशन्स सुरू केले आहेत.
भिवंडीमध्ये प्रामुख्याने ग्राहकोपयोगी उत्पादने, टायर्स, पॅकेजेस, इलेक्ट्रॉनिक्स, आयात उत्पादने आणि कच्चा माल यांच्या शिपमेंट्स हाताळल्या जातात. भिवंडीमधील ट्रक एनसीआर (गुरगाव, दिल्ली, नोएडा आणि गाझियाबाद), कोलकाता, गुवाहाटी, हैदराबाद, चेन्नई आणि कोची आणि पूर्वेकडे बंगळुरूपर्यंत जाऊ शकतात. आणखी काही लहान मार्गदेखील येऊन जातात आणि ते म्हणजे भिवंडी ते पुणे, नागपूर, अहमदाबाद, गोवा आणि इंदोर हे आहेत.
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट- न्हावा शेवा (जेएनपीटी) या भारताच्या सर्वांत मोठ्या आणि व्यग्र कंटेनर पोर्ट सुविधेतून १५०० पेक्षा अधिक गोदामांसह भिवंडीला मालवाहतूक केली जाते. या संपूर्ण क्षेत्रात मासिक २०,००० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय हाताळला जातो. भिवंडी राहोच्या नेटवर्कअंतर्गत आल्यामुळे त्यातून फक्त पश्चिम प्रदेशातल्याच नाही तर संपूर्ण देशातील व्यवसायांना योगदान मिळेल, अशी आशा आहे.
राहोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक इम्तियाझ म्हणाले की, “आमच्याकडे राष्ट्रांतर्गत डिजिटल फ्रेट नेटवर्क आणि संपूर्ण देशात अस्तित्व आहे. भिवंडीचा नेटवर्कमध्ये समावेश झाल्यामुळे पश्चिम प्रदेशातील वाढत्या मागणीची पूर्तता होऊ शकेल. भिवंडी भौगोलिकदृष्ट्या उत्तम ठिकाणी स्थित आहे आणि ते अनेक शिपमेंट्सच्या ने-आणीचे केंद्र आहे. त्यामुळे आम्हाला पश्चिम प्रदेशात असलेल्या भागीदारांना सेवा देता येईल आणि त्याचबरोबर जमिनीने व्याप्त उत्तर भागासाठीही तो गेटवे होईल.”
राहोने गुरगाव, बिलासपूर, रूद्रपूर, कर्नाल, पालवल, सोनीपत, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, पुणे आणि कोईम्बतूरजवळील तिरूपूरमधील कार्यालयांसोबत संपूर्ण भारतात आपला पाया मजबूत केला आहे.