दैनिक स्थैर्य । दि. ११ नोव्हेंबर २०२२ । सातारा । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या मार्फत जिल्हा न्यायालयातील रामशास्त्री सभागृहात कायद्या विषयी माहितीच्या पोस्टरचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. Pan India Campaign Empowerment of Citizens through legal awarneness अंतर्गत भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे, यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तृप्ती जाधव, जिल्हा न्यायालयाच्या प्रबंधिका, कोर्ट मॅनेजर, अधीक्षक, न्यायालयीन कर्मचारी, विधी स्वयंसेवक व पॅनेल विधिज्ञ उपस्थिती होते.
तसेच नागरिकांना विधी सेवा योजनेविषयी माहिती देण्यासाठी शहरात जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, मध्यवर्ती बस स्थानक, नगरपरिषद व जिल्हा न्यायालय येथे मदत कक्ष उभारण्यात आले होते. जिल्हा कारागृह येथे बंद्यांच्या जनजागृतीकरिता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अॅड. राजश्री सावंत यांनी बंद्यांसाठी सुरु असलेल्या अभियानाबाबत माहिती दिली. तर अॅड. शरद जांभळे यांनी बंद्याना असणा-या सुविधा, आणि हक हमारा भी तो है @75 या पॅन इंडिया अभियानाची माहिती दिली. त्यानंतर सचिव तृप्ती जाधव यांनी प्रातिनिधीक स्वरुपात पुरुष व महिला बंद्याना ओळखपत्र दिली. या कार्यक्रमास जिल्हा कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी सुरुवातीस मान्यवरांचे स्वागत करुन आभार प्रदर्शन केले. या वेळी सुमारे १५४ बंदीजन उपस्थित होते.