स्थैर्य, फलटण, दि. ०३ : साताराचे प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी संपुर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ब्रेक द चेन अंतर्गत नव्याने आदेश लागू केलेले आहेत. सदरील आदेश फलटण उपविभागातील प्रतिबंधक क्षेत्र वगळता इतरत्र सर्वत्र लागू राहणार आहेत. फलटण शहर व कोळकीसह तालुक्यातील आठ गावे ही पुर्णतः प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे तेथे शासनाच्या नियमानुसार प्रतिबंधक क्षेत्राचे नियम लागू राहणार आहेत. प्रतिबंधक क्षेत्र वगळता इतरत्र प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पारित केलेले आदेश लागू राहतील, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.